Studybuddhism.com हा बौद्ध शिकवणीसाठीचा व्यावहारिक मांडणी असलेला विस्तृत स्रोत आहे. कोणत्याही जाहिरातीशिवाय आणि विनामूल्य स्वरूपात तिबेटी ज्ञान सर्व जगाला सहज उपलब्ध करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे.
८० हून अधिक वर्षांचा अनुभव असलेले बौद्ध शिक्षक, अनुवादक डॉ.अलेक्झांडर बर्झिन यांनी २००१ साली स्थापन केलेले हे संकेतस्थळ बर्झिन अर्काइव्हची पुढील आवृत्ती आहे. सुमारे ८० लोकांच्या आंतरराष्ट्रीय गटाचा अंतर्भाव असणाऱ्या studybuddhism.com चा अधिक विस्तार होत आहे. आम्ही दैनंदिन पातळीवर नवे लेख आणि दृकश्राव्य माध्यमातून बौद्ध शिकवण सादर करतो.
दोन दशकांहून अधिक काळापासून, स्टडी बुद्धिझम हे जगभरातील लोकांसाठी मोफत, सहज उपलब्ध आणि उच्च-गुणवत्तेची बौद्ध संसाधने प्रदान करणारे एक जुने आणि समर्पित ऑनलाइन व्यासपीठ म्हणून उभे आहे.
प्रमाणबद्ध शिकवण नवीन अभ्यासकांसाठी उपयुक्त सामग्रीपासून ते शास्त्रशुद्ध अभ्यासपूर्ण अंतर्दृष्टींपर्यंत, आमचे व्यासपीठ विविध प्रकारच्या शिक्षणाचा समावेश करते | |
विस्तृत सामग्री संग्रह: ३७ भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या १६,००० हून अधिक लेखांसह, स्टडी बुद्धिझम हा ज्ञानाचा एक अमूल्य खजिना आहे. | |
सामग्रीची विविध माध्यमं पॉडकास्ट्सपासून व्हिडिओज, मुलाखती, लेख, ध्यानधारणा आणि अभ्यासक्रमांपर्यंत — आम्ही एक बहुआयामी शिक्षण अनुभव प्रदान करतो. | |
जाहिरात-मुक्त अनुभव: आमच्या संसाधनांचा अनुभव घ्या, कोणत्याही अडथळ्यांशिवाय किंवा विचलनांशिवाय | |
पंथनिरपेक्ष दृष्टिकोन: आम्ही विविधता आणि समावेशकतेचे स्वागत करतो, शक्य तितक्या बौद्ध परंपरांमधून ज्ञान प्रदान करतो. | |
विशिष्ट ऐतिहासिक दृष्टिकोन: इतर ठिकाणी न मिळणारी ऐतिहासिक माहिती शोधा, जी बौद्धधर्माच्या वारशाची तुमची समज समृद्ध करते. |