इतिहास आणि संस्कृती
बौद्ध धर्माची शिकवण आहे की सर्व काही कारणे आणि परिस्थितीतून उत्पन्न होते. याला धर्मही अपवाद नाही. ज्या-ज्या देशात आणि संस्कृतींमध्ये याचा प्रसार झाला त्यांनी त्याच्या विकासाला हातभार लावला. कालांतराने बौद्ध आणि इतर धर्मांतील विचारांच्या आदानप्रदानातून सर्वांचीच उन्नती झाली. आता बौद्ध विचारधारा आणि पद्धतींचा जगभर प्रसार होत असताना बौद्ध तत्त्वांना जीवनाच्या नवनव्या परिघात स्वीकारलं जात आहे.