जीवनाचा सन्मान करणं

आपल्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वतःवर काम करण्यासाठी उपलब्ध असणारी संधी आणि स्वातंत्र्याचा आपण आदर राखण्यास शिकतो.
Meditations appreciating life

स्पष्टीकरण 

अनेकदा छोट्या छोट्या समस्यांमुळे आपल्याला स्वतःबद्दल कणव वाटत असते, जसे आपल्याला ज्या पदार्थाची आर्डर द्यायची आहे, रेस्टॉरंटमध्ये तो पदार्थ संपलेला असणं किंवा आपल्याला हव्या त्या तारखेला विमानाचं किंवा रेल्वेचं आरक्षण न मिळणं किंवा थंडी भरल्यानं आपल्याला हवं तेव्हा पोहायला जाता न येणं. पण वस्तुनिष्ठपणे जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला जाणीव होईल की आपण किती नशीबवान आहोत. काहीतरी विधायक काम करण्यासाठीच्या आपल्या क्षमतांना मारक ठरणाऱ्या परिस्थितीपासून आपण मुक्त आहोत. शिवाय आपलं जगणं सुधारणाऱ्या बुद्धिजम सारख्या आध्यात्मिक शिकवणी आत्मसात करण्यासाठी आपल्याकडे अनेक संधी उपलब्ध आहेत.     

जर आपण नेपाळमधल्या २०१५च्या भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत असतो, किंवा दुष्काळी भागात किंवा युद्धजन्य भागात असतो, किंवा एखाद्या अशा जागी असतो, जिथं आध्यात्मिक साधना कायदाविरोधी मानली जात असेल किंवा तशी साधनाच उपलब्ध नसेल किंवा एखाद्या हिंसक गुन्हेगारासोबत एखाद्या तुरुंगात कैद असतो किंवा लष्करात युद्धजन्य स्थितीत लढत असतो, तर आपण बौद्ध शिकवण आत्मसात करू शकलो असतो का किंवा त्यांची साधना करू शकलो असतो का? किंवा आपण शारीरिक, मानसिक किंवा भावनिक दृष्ट्या अपंग असतो, तर कदाचित साधना शक्य झाली असती, पण ती करणं तितकंच कठीण नसतं का? किंवा आपण इतके श्रीमंत असतो की आपल्याला काम करण्याची गरजच नसती आणि आपलं संपूर्ण जीवन पार्टी आणि मनोरंजनाने भरलेलं असतं, त्या स्थितीत आपण आध्यात्मिक साधनेत रस घेतला असता का? किंवा आपण अजिबात मोकळ्या मनाचे नसतो आणि आध्यात्मिक साधनेच्या विरोधात असतो तर?

शिवाय, आपल्याकडे सध्या अनेक संधी उपलब्ध आहेत. अनेक शिकवणींची भाषांतरे उपलब्ध आहेत. त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत आणि धर्म संरक्षकांनी त्यांची प्रकाशनं इंटरनेटवर उपलब्ध केली आहेत. शिवाय जिथं आपण शिकवण आत्मसात करू शकतो अशी केंद्रं, त्यांना पाठबळ देणारे लोक आणि शिकवण देणारे गुरूही उपलब्ध आहेत. आणि आपल्याकडे शिकण्याची बुद्धी आणि इच्छा आहे.   

आपण अशा भयानक स्थितीपासून मुक्त आहोत आणि आपले आयुष्य अनेक संधींनी परिपूर्ण आहे, ही वस्तुस्थिती आपले जीवन अद्वैत बनविते. आपण आपल्या अमूल्य जीवनात आनंद पेरण्याची गरज आहे आणि त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचीही गरज आहे. 

ध्यानधारणा

  • श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करत चित्त स्थिर करा.
  • कल्पना करा की ऐन भूकंपाच्या काळात तुम्ही नेपाळमध्ये गिर्यारोहण करत आहात आणि तुम्ही अशा परिस्थितीत अडकले आहात, जिथून बाहेर पडायला मार्गच नाही आणि तिथं अन्नपाणीही नाही. 
  • त्यानंतर कल्पना करा की तुम्हाला तिथून वाचवून परत घरी आणून सोडण्यात आलं आहे. 
  • त्या भयानक परिस्थितीतून मुक्त झाल्यानंतर किती आल्हाददायक वाटेल याची अनुभूती घ्या. 
  • त्या मुक्ततेचा आनंद घ्या. 
  • कल्पना करा सिरीया आणि इस्लामिक स्टेटनं तुमचं शहर ताब्यात घेतलं आहे आणि तुम्हाला बाहेर पडायला मार्गच नाही.         
  • त्या नंतर तिथून मुक्तता झाल्याची कल्पना करा. 
  • आनंद घ्या. 
  • जे तुम्हाला दिवसरात्र घाबरवत असतात, अशा एखाद्या भीतिदायक हिंसक गुंडांच्या टोळीसोबत तुम्ही तुरूंगात कैद आहात, अशी कल्पना करा. 
  • त्या नंतर तुरूंगातून मुक्त झाल्याची कल्पना करा.
  • आनंद घ्या. 
  • सुदानमधल्या दुष्काळात तुम्ही भुकेनं बेहाल झाले असल्याची कल्पना करा. 
  • त्या नंतर तुम्हाला अन्न मिळाल्याची आणि खाण्यापिण्यासाठी भरपूर अन्नपाणी असल्याची कल्पना करा.  
  • आनंद घ्या. 
  • तुम्हाला अल्झायमर झाला आहे, तुम्हाला काहीही किंवा कुणीही आठवत नाही आणि तुम्ही तीन शब्दही उच्चारू शकत नाही, अशी कल्पना करा. 
  • त्या नंतर बरे झाल्याची कल्पना करा. 
  • आनंद घ्या. 
  • नंतर तुमच्या डोक्यावरचं हे ओझं उतरल्याची प्रागतिक अनुभूती घ्या- नेपाळच्या भूकंपात अडकलेलं असणं, आयसिसच्या अधिपत्याखालील सिरीयात अडकलेलं असणं, हिंसक गुंडांसोबत तुरूंगात असणं, सुदानमध्ये भूकबळी अनुभवणं, अल्झायमर अनुभवणं. 
  • तुमच्याकडे असलेलं अद्वैत स्वातंत्र्य अनुभवा. 
  • नंतर तुमच्याजवळ असणाऱ्या अद्भुत संधींचा विचार कराः अनेक शिकवणींची भाषांतरे उपलब्ध आहेत. त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत आणि धर्म संरक्षकांनी त्यांची प्रकाशनं इंटरनेटवर उपलब्ध केली आहेत. शिवाय जिथं आपण शिकू शकतो अशी केंद्रं, त्यांना पाठबळ देणारे लोक आणि शिकवण देणारे गुरूही उपलब्ध आहेत. आणि आपल्याकडे शिकण्याची बुद्धी आणि इच्छा आहे. 
  • शेवटी, स्वतःला तुमच्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची आणि समृद्ध घटकांची जाणीव करून द्या. आणि हे इतर अनेक लोकांच्या आणि इतिहासातील अनेक व्यक्तींच्याही तुलनेत किती भाग्याचं आहे, याची स्वतःला जाणीव करून द्या. 
  • त्याचा आनंद घ्या आणि ठाम निर्णय घ्या की या अद्भुत आयुष्याचा तुम्ही परिपूर्ण लाभ घ्याल आणि ते व्यर्थ घालवणार नाही. 

सारांश 

जेव्हा आपण आपल्या सद्यस्थितीविषयी आणि आपण किती भाग्यवान आहोत, याविषयी विचार करतो आणि किमान या क्षणीतरी जीवनातील अशा संघर्षापासून मुक्त असल्याबद्दल, ज्यामुळे आपण भावनिक आणि आध्यात्मिक विकासासाठी वेळ काढू शकतो, याविषयी विचार करतो, तेव्हा आपल्याला आपल्याजवळ असणाऱ्या सुविधेबद्दल प्रचंड समाधान वाटते. जरी कुणाचंच आयुष्य परिपूर्ण नसलं किंवा कोणतीही परिस्थिती परिपूर्ण नसली तरी, पण ते किती वाईट असू शकलं असतं, त्या तुलनेत आपण खरेच भाग्यशाली आहोत. या सन्मानजनक जाणीवेसह, आपलं जीवन सुधारण्यासाठीच्या उपलब्ध संधींचा पुरेपूर लाभ घेण्याच्या दिशेने आपण पावलं उचलू शकू यासाठी आवश्यक विश्वास आपल्यात रूजतो. 

Top