वैश्विक नीतिमत्तेने शांततेला चालना देणं

Uv promoting peace

मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या तरुणांची संख्या आज प्रचंड वाढली आहे. आजच्या जगातील ही एक मोठी समस्या आहे, आणि ही समस्या कशी सोडवायची हा प्रश्नही त्यासोबतच येतो.

वरकरणी धर्माच्या नावाखाली होणारी अनेक युद्ध, संघर्ष व दहशतवादी हल्ले आपण पाहतो. परम पूजनीय दलाई लामा बऱ्याच ठिकाणी प्रवास करतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना भेटणारे लोक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व वैद्यकीय तज्ज्ञ एकच प्रश्न विचारतात: जगात या समस्या का आहेत? दहशतवाद, भ्रष्टाचार, लिंगभावात्मक भेदभाव, श्रीमंत व गरीब यांच्यातील तफावत, आणि तरुणाईचे मानसिक प्रश्न, अशा अनेक संकटांमधून जग जातं आहे. आज मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या तरुण लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे- हे एक मोठं संकट ठरावं इतकी ही संख्या जास्त आहे. या समस्या आपण कशा सोडवू शकतो?

मानसिक आरोग्याच्या प्रश्नांबाबत, आधुनिक शिक्षणाने असे प्रश्न सोडवणं अभिप्रेत असतानाही या समस्या का वाढत आहेत, असा प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे. नक्की समस्या काय आहे? ती कशी उद्भवते? परम पूजनीय दलाई लामांना सर्रास विचारला जाणारा हा प्रश्न आहे. यावर दलाई लामा न अडखळता सांगतात की, आधुनिक शिक्षणव्यवस्थेमध्ये त्रुटी असल्यामुळे आहे हे असं आहे. आपली शिक्षणव्यवस्था मूलतः बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी तयार केलेली आहे, ही यातील त्रुटी आहे. ‘दोन अधिक दोन बरोबर चार’, असं आपण वर्गात म्हटलं की आपण पास होतो. आपलं प्रचंड सुंदर हृदय, निःस्वार्थीपणा व मोहिनी असली, आणि आपण ‘दोन अधिक दोन बरोबर बहुधा चार’ असं म्हटलं, तर आपण नापास होतो. कोणीही हृदयाने मोजत नाहीत! केवळ हृदयाला विश्वसनीय मानलं जातं.

सद्यस्थितीला हे जबाबदार आहे. केवळ मेंदूचा विकास केल्याने जगात सुखाची हमी मिळत नाही, किंवा मानवतेमध्ये परस्पर विश्वास, प्रेम व करुणा निर्माण होईल याचीही हमी मिळत नाही. व्यावहारिक पीळईवर समुदायाला व्यापक शांतता व सौहार्दाकडे नेणारी प्रेरक शक्ती कोणती असू शकते? तर, आपलं हृदय, आपलं मानवी हृदय.

या हृदयाच्या बाबतीत तडजोड न करता जगाची प्रगती होण्यासाठी शहाणीव गरजेची आहे. शहाणीव आणि हृदय हातात हात घालून जातात. नीतिमत्ता व नैतिकतेचा आधार वैश्विक करुणामय हृदय हा असतो, हे लक्षात घ्यायला हवं. हे कोणी नाकारत नाही. कोणी अश्रद्ध असू दे अथवा धार्मिक असू दे, शिक्षित असू दे वा निरक्षर असू दे, त्याने काही फरक पडत नाही. कोणी आपल्याबाबतीत ममत्व व आस्था दाखवली तर प्रत्येकालाच आनंद होतो. नीतिमत्तेच्या मुळाशी करुणा- इतरांबाबतचं प्रेम व करुणा- असते, हे लक्षात ठेवायला हवं.

मग पुढचा प्रश्न येतो: आपण काय करू शकतो? आपण याला चालना कशी देऊ शकतो? एक, जगभरातील केंद्रं याबाबतीत मदत करू शकतात. उदाहरणार्थ, इथे दिल्लीतील रामानुजन महाविद्यालयातील सेंटर फॉर एथिक्स अँड व्हॅल्यूजमध्ये परम पूजनीय दलाई लामांच्या देखरेखीखाली वैश्विक नीतिमत्तेला चालना देण्यासाठी एक मोठा प्रकल्प साकारतो आहे.

इतरांनी अधिक करुणामय व्हावं, यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण कृती कशी करू शकतो, याचा विचार आपण करायला हवा. हे पंथाच्या रूपात असता कामा नये, तर खुलेपणा, समजूतदारपणा व स्नेह या रूपात असायला हवं. जगामध्ये नाट्यमय बदल घडवणं आपल्याला शक्य नसेलही, पण आपल्या आसपासचे जे लोक अधिक करुणामय वागू शकतील, पण ज्यांना तसं वागण्याचं सुचलं नसेल, त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणं आपल्याला शक्य असतं. आपण इतरांवर प्रभाव कसा टाकू शकतो? जगावर प्रभाव टाकू शकतील, अशा लोकांना भेटणं आपल्याला शक्य नसेल, तर किमान करुणेचं महत्त्व इतरांना कळेल यासाठी बोलण्याचे मार्ग कोणते आहे ते तपासावं. कोणत्याही लोकांपर्यंत- विशेषतः तरुणतरुणींपर्यंत- हा संदेश जावा. शेवटी, आजची तरुणाची भविष्यातील आशा असते.

Top