गेशे ङावंग धारग्ये (१९२५-१९९५) हे मुख्यतः बौद्ध धर्मातील विख्यात गुरु होते. सेरा जे मठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नऊ पुनर्जन्म झालेल्या लामांना (तुल्कूंना) आणि हजारो पाश्चिमात्त्य अनुयायांना प्रशिक्षण दिले. दलाई लामांनी त्यांची धरमशाला येथील लायब्ररी ऑफ तिबेटी वर्क्स अॅण्ड अर्काइव्ह येथे प्रमुख शिक्षक म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी तिथे १३ वर्षं अध्यापन केले. एका व्यापक आंतरराष्ट्रीय दौऱ्यानंतर त्यांनी डुनेडिन, न्यूझिलंड येथे धारग्ये बुद्धिस्ट सेंटरची स्थापना केली आणि आपले उर्वरित आयुष्य तिथे अध्यापन केले.