वैयक्तिक अवकाश
लक्ष व स्व-जागरूकता
स्वतःच्या शरीराकडे व त्याच्या संवेदनांकडे लक्ष देणं
- आपल्या शरीरामध्ये काय घडतं आहे, त्याकडे लक्ष देणं
- अति किंवा अल्प उत्तेजनेच्या स्थिती लक्षात घेणं (चिंता, राग, आळस, निराशा, इत्यादी)
- समतोल शरीर कसं असतं हे समजून घेणं
स्वतःच्या भावभावनांकडे लक्ष देणं
- सजगतेसारख्या उपासनांद्वारे आपल्या मनाकडे लक्ष देणं
आपल्या मनाचा नकाशा अनुसरणं
- भावना, त्यांची वैशिष्ट्यं आणि त्या कशामुळे उद्भवतात व त्यांना कशामुळे चालना मिळते, हे ओळखण्याची क्षमता
- विध्वंसक भावना अनिर्बंध भावनिक अवस्थांमध्ये रूपांतरित होण्यापूर्वी त्या कशा ओळखायच्या व त्यांना कसं हाताळायचं याचं शिक्षण
आत्म-करुणा
भावना संदर्भासह समजून घेणं
- आपल्या भावना आपल्या मूल्यांशी, गरजांशी व अपेक्षांशी कशा जोडलेल्या असतात हे समजून घेण्यासाठी चिकित्सक विचार करणं
- स्वतःच्या मूल्याची दखल घेणं आणि स्वतःचं मूल्य व आत्मविश्वास यांच्या जाणिवेची जोपासना करणं
स्वतःचा स्वीकार
- स्वतःच्या मर्यादा व सामर्थ्य या संदर्भात वास्तववादी परिप्रेक्ष्य ठेवणं
- मनोधैर्य, चिकाटी, नम्रता व धाडस यांची जोपासना करणं
- निराशा व त्रास हे जीवनाचे नैसर्गिक भाग आहेत हे समजून घेणं
आत्म-नियमन
शरीराचा समतोल (आपल्या शारीरिक स्वत्वाला सक्रिय, चिकाटीच्या व समतोल अवस्थेमध्ये आणणं) राखण्यासाठी:
- संसाधने राखणे- मित्र, आवडतं ठिकाण किंवा सुखद आठवणी यांसारखी संसाधने आपण यातून मिळवतो
- ठोस आधार- आपल्याला पाठबळ मिळाल्यासारखं किंवा ठोस आधार मिळाल्यासारखं वाटतं ती वस्तू धरून ठेवणं
- योग, ताई-चाई, संगीत ऐकणं, रेखांकन किंवा ध्यानधारणा यांसारख्या कृती करणं
बोधात्मक व उत्स्फूर्तता यांवर नियंत्रण
- आपली लक्ष ठेवण्याची कौशल्यं सुधारणं, जेणेकरून विचलित करणाऱ्या विषयांमध्ये गुंतून आपण लक्ष टिकवून ठेवू शकतो
भावनांना वाट काढून देणं
- कोणत्या भावना उपकारक आहेत व कोणत्या अपायकारक आहेत, हे ओळखण्यासाठी भावनिक विवेक विकसित करणं
- हा विवेक धाडसाच्या व आत्मविश्वासाच्या भावनेमध्ये रूपांतरित होऊ देणं, जेणेकरून आपण भावनांकडून नियंत्रित होण्याऐवजी आपल्या भावनांच्या नियंत्रणाचा ताबा आपण घेऊ शकतो.
सामाजिक अवकाश
आंतरवैयक्तिक जागरूकता
आपल्या सामाजिक वास्तवाकडे लक्ष देणं
- आपण सामाजिक जीव आहोत हे समजून घेणं
- आपल्या जीवनामध्ये इतर लोक कोणती महत्त्वाची भूमिका निभावतात याचा शोध घेणं
आपल्या इतरांसोबतच्या सामायिक वास्तवाकडे लक्ष देणं
- आपल्याप्रमाणे इतरांचीही भावनिक जीवनं आहेत हे समजून घेणं
- आपल्या सर्वांना गरजा व भीती असतात, हा सारखेपणा लक्षात घेणं
- गरजा व भीती व्यक्तिगणिक बदलतात, या वस्तुस्थितीचा आदर करणं
वैविध्य व भेद यांची दखल घेणं
- आपल्याला आकार देणारे सर्वांचे जीवनानुभव अनन्य कसे असतात, हे लक्षात घेणं
- मतभेदांमुळे आपण एकमेकांपासून दूर होण्याऐवजी एकमेकांजवळही येऊ शकतो, हे समजून घेणं.
इतरांविषयी करुणा
इतरांच्या भावभावना संदर्भासह समजून घेणं
- इतर लोकांच्या कृती भावनांनी प्रेरित झालेल्या असतात आणि भावना अंतःस्थ गरजांमधून उद्भवतात, हे समजून घेणं
- लोकांच्या कृतीवर संतापाने किंवा तत्काळ निवाडा करण्याच्या वृत्तीने प्रतिक्रिया देण्याऐवजी करुणेने प्रतिक्रिया देणं
दयाभाव व करुणा यांची दखल घेणं व जोपासना करणं
- करुणा म्हणजे काय असतं व काय नसतं, याचा शोध घेणं
- करुणा ही लाभदायक गोष्ट असल्याचं मूल्य जाणणं, आणि तिच्या जोपासनेची इच्छा राखणं
इतर नैतिक भूमिकांची दखल घेऊन त्यांची जोपासना करणं
- भौतिक मालमत्तेनेच केवळ आपल्या सर्व गरजांची पूर्तता होणार नाही, हे लक्षात घेणं
- आपल्या जीवनासाठी उपकारक ठरतील अशा अंतर्गत गुणांचा शोध घेणं
- स्वकेंद्री मनोवृत्तीच्या तोट्यांवर चिंतन करणं
- इतरांविषयी सहानुभूती व क्षमाशीलता निर्माण करणं
संबंधनिष्ठ कौशल्यं
सहानुभूतीपूर्ण ऐकून घेणं
- इतरांचं खुल्या मनाने ऐकून घेणं
- “सखोल ऐकून घेण्या”च्या उपक्रमांचा सराव करणं, त्यात आपण कोणतीही टिप्पणी अथवा निवाडा न करता इतरांचं ऐकून घेतो.
कुशल संदेशन
- स्वतःला व इतरांसाठी उत्पादक ठरेल व सबलीकरण होईल अशा रितीने संदेशनाची क्षमता विकसित करणं
- मित्रांसोबत विविध विषयांवर चर्चा करणं आणि आपण सर्वसाधारणतः विरोध करू अशा बाजू घेणं
इतरांना मदत करणं
- सामुदायिक सेवेमध्ये, स्वयंसेवी कार्यामध्ये आणि दयाभावाच्या यादृच्छिक कृतींमध्ये सहभागी होणं
संघर्षामध्ये बदल
- संघर्षातून यशस्वीरित्या वाट काढण्याचं शिक्षण
- बाहेरच्या शांततेचा पाया असलेली अंतर्गत शांतता विकसित करणं
जागतिक अवकाश
परस्परावलंबित्वाची दखल घेणं
परस्परावलंबी व्यवस्था समजून घेणं
- परस्परावलंबित्व हा निसर्गाचा कायदा आहे आणि मानवी जीवनाचं ते एक मूलभूत वास्तव आहे, हे समजून घेणं
- आपण इतरांविना जगू शकत नाही, हे लक्षात घेणं
व्यवस्थांतर्गत व्यक्तींचा संदर्भ
- इतरांविषयी कृतज्ञतेची प्रामाणिक भावना निर्माण करणं
- इतरांच्या जीवनाला आकार देण्याच्या आपल्या सामर्थ्याविषयी सखोल जागरूकता विकसित करणं
- व्यापक कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या कृतींमध्ये सहभागी होण्याची इच्छा राखणं
सामायिक मानवता ओळखणं
सर्वांसाठीच्या मूलभूत समतेची दखल घेणं
- सर्वत्र माणसं मूलभूतरित्या समान असतात- त्यांना सुख हवं असतं व दुःख नको असतं
- आपल्या “आंतर-गटा”बाहेरच्या लोकांना समाविष्ट करून घेण्याइतकी आपली सहानुभूती विस्तारणं
व्यवस्था आपल्या कल्याणावर कशा परिणाम करतात याची दखल घेणं
- सकारात्मक मूल्यांना चालना देऊन किंवा समस्याग्रस्त धारणा व विषमता टिकवून आपल्यावर परिणाम करणाऱ्या सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक व्यवस्थांचं विश्लेषण
सामुदायिक व जागतिक कामांमधील सहभाग
समुदायामध्ये व जगामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं आपलं सामर्थ्य
- आपल्या मर्यादा असल्या, तरी आपल्यामध्ये मोठ्या क्षमताही असतात, हे समजून घेणं
- लहान सुटे बदल व्यापक जागतिक बदलांमध्ये योगदान देऊ शकतात, हे लक्षात घेणं
सामुदायिक व जागतिक उपायांमध्ये सहभागी होणं
- आपण ज्यात जगतो त्या व्यवस्था व त्यांची व्यामिश्रता समजून घेणं
- कृतींच्या अल्पकालीन व दीर्घकालीन परिणामांचे मूल्यमापन करणं
- नकारात्मक भावना व पक्षपात यांचा परिणाम कमी करणं
- खुलं मन असलेली, सहकार्याधारित व बौद्धिकदृष्ट्या नम्र मनोवृत्ती जोपासणं
- कोणत्याही विशिष्ट कृतिक्रमाचे फायदे व तोटे विचारात घेणं
याहून सखोल जायची इच्छा असल्यास ‘सी’ शिक्षणाच्या चौकटीचा पूर्ण परिचय वाचावा आणि ‘सेंटर फॉर कन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्स’च्या इतर कार्यक्रमांबद्दलही माहिती घ्यावी.