Study buddhism tsenzhab serkong tulku 400

त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे द्वितीय

वयाच्या दुसऱ्या वर्षी त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे द्वितीय (१९८४- आजपर्यंत) यांनी चौदाव्या दलाई लामांच्या नुकत्याच दिवंगत झालेल्या शिक्षकांच्या छायाचित्राकडे इशारा करत 'हा तर मीच आहे' असे उद्गार काढले.  त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे यांचा पुनर्जन्म असल्याची ओळख पटल्यानंतर छोट्या तुल्कू यांचे दक्षिण भारतातील गान्देन जांग्त्से मठात प्रशिक्षण पार पडले. धर्माप्रति आपले कार्य सुरू ठेवण्याच्या निश्चयाने त्यांनी धरमशाला येथील बौद्ध द्वंद्ववाद संस्थेत पुढील शिक्षण घेतले. दलाई लामा यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दोन वर्ष कॅनडा येथे इंग्रजी विषयाचे अध्ययन केले आणि आता ते बौद्ध धर्मातील उच्चतम शिक्षण घेत आहेत. 

Top