कोव्हिड १९ विरोधी जागतिक संघटित लढ्यासाठी जगाने एकत्र येण्याची गरज

World in hands

या गंभीर संकटाच्या काळात आपल्या आरोग्याला गंभीर धोका आहेच, पण या संकटात आप्तस्वकीय आणि मित्र गमावण्याचं दुःखही आहे. सरकारांपुढे आर्थिक घडी विस्कळीत झाल्याचं प्रमुख आव्हान आहे, तर अनेक लोकांच्या स्वतःची गुजराण करण्याच्या क्षमतेलाच या संकटानं दुर्बल ठरवलं आहे.

हाच काळ आहे, जेव्हा संपूर्ण मानवी कुटुंबाचा भाग म्हणून एकत्रित येणाऱ्यावर आपण लक्ष केंद्रित करायला हवे. एकमेकाप्रंति करुणाभाव बाळगणे आवश्यक आहे. मानवी जीव म्हणून आपण सर्व जण एकसारखे आहोत. आपण सर्व जण एकसारखीच भीती, आशा, असुरक्षितता अनुभवतो आणि तरी आपण सुखाच्या इच्छेने एकत्रित बांधलेले आहोत. आपली कार्यकारणभावाची मानवी क्षमता आणि वास्तववादी दृष्टिकोन आपल्याला संकटाचा काळ संधीमध्ये परावर्तित करण्याची क्षमता बहाल करतो.

हे संकट आणि त्याचे परिणाम आपल्यासाठी सतर्कतेचा इशारा आहे की केवळ एकत्रित येऊन, संघटितरीत्या जागतिक लढा देऊन, आपण या अभूतपूर्व आवाका असलेल्या संकटाचा मुकाबला करू शकतो. मी प्रार्थना करतो की आपण हे ‘द काॅल टू युनाइट’चे आवाहन मनावर घ्याल. 

दलाई लामा, ३ मे, २०२०

Top