त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे (१९१४-१९८३) चौदावे दलाई लामा यांचे मुख्य वादविवाद साहाय्यक आणि शिक्षकांपैकी एक होते. तिबेटी बौद्ध धर्माच्या चारही विचारधारांचे जाणकार असलेल्या सरकॉंग रिंपोछे यांनी भारतातील तिबेटी मठ उभारणीत मोलाची भूमिका बजावली. त्यांनी उत्तर अमेरिका आणि युरोपात दोन अभ्यास दौरे केले. यावेळी आपले व्यावहारिक ज्ञान, विनोदबुद्धी आणि विनम्र स्वभावाने त्यांनी भेटलेल्या प्रत्येकाचे मन जिंकले.