परमपूज्य दलाई लामा यांचा संदेश

एकविसावे शतक प्रगतीपथावर असताना जागतिक आदान-प्रदानासाठी इंटरनेट हे व्यापक आणि महत्त्वाचे माध्यम होऊ लागले आहे. हे बौद्ध शिकवण, त्याचा इतिहास आणि तिबेटी संस्कृतीतील अनेक महत्त्वाच्या विषयांच्या माहितीच्या प्रसारासाठीही लागू होते. विशेषतः जिथे पुस्तके आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नाहीत, अशा दुर्गम भागांमध्ये इंटरनेट हे अगणित लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा मुख्य स्रोत ठरले आहे.

गैरसमज आणि सांप्रदायिकतेसारख्या गोष्टी सामान्य बनलेल्या आजच्या जगात, मतभेदांना इंधन पुरविणारे अज्ञान संपविण्यासाठी शिक्षणच प्रभावी साधन आहे. त्यासाठी मी डॉ. अलेक्झांडर बर्झिन यांनी सुरू केलेल्या berzinarchives.com या संकेतस्थळाचे स्वागत करतो. बौद्ध धर्म आणि तिबेटी संस्कृतीतील विविध विचारधारांसंदर्भातील विस्तृत लेखमालांचा समावेश असलेले हे जागतिक पातळीवरील मौल्यवान शैक्षणिक साधन आहे.

२६ जानेवारी, २००७
परमपूज्य दलाई लामा

Top