आध्यात्मिक गुरु

बौद्ध शिकवणींना तेव्हाच प्रमाणित मानलं जातं जेव्हा त्यांना सिद्धी प्राप्त झालेल्या गुरुजनांच्या वंश श्रृंखलेच्या माध्यमातून बुद्धाच्या शिकवणींशी प्रमाणित केलं जातं. आपण याबाबत आश्वस्थ झाल्यानंतर आणि त्यांच्या वापराची सुयोग्य पद्धती जाणून घेतल्यानंतर इच्छित लाभकारी परिणाम देणारी शिकवण अंगीकारण्यास सुरुवात करणार आहोत.

शाक्यमुनि बुद्ध

शाक्यमुनि बुद्ध हे महान बौद्ध गुरु होते. सुमारे २५०० वर्षांपूर्वी त्यांचा भारतात जन्म झाला. आणि ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी इतरांनाही ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखवला.

नागार्जुन

नागार्जुन पहिले भारतीय गुरु होते, ज्यांनी शून्यवादाच्या बौद्ध शिकवणीवर प्रकाश टाकला.

आर्यदेव

आर्यदेव हे नागार्जुन यांचे मुख्य शिष्य होते. त्यांनी नागार्जुन यांच्या शून्यवादाची अधिक व्यापक मांडणी केली.

शांतिदेव

शांतिदेव महान भारतीय गुरु होते, ज्यांनी बोधिसत्वाची शिकवण दिली.

अतिशा

तिबेटमधील बौद्ध धर्माच्या अल्पकालीन ऱ्हासानंतर अतिशा यांनी पुन्हा भारत ते तिबेट बौद्ध धर्माचा प्रसार केला.

चौदावे दलाई लामा

१९८९ साली शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार लाभलेले आणि जगभर अहिंसा आणि करुणेच्या संदेशाचा प्रसार करणारे चौदावे दलाई लामा तिबेटमधील प्रमुख बौद्ध धर्मगुरु आहेत.

योंगझिन लिंग रिंपोछे

योंगझिन लिंग रिंपोछे चौदावे दलाई लामा आणि गेलुग्पा परंपरेतील ९७वे आध्यात्मिक गुरु गान्देन त्रिपा यांचे मुख्य शिक्षक होते.

त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे

त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे चौदाव्या दलाई लामांचे मुख्य वादविवाद साहाय्यक आणि तिबेटी बौद्ध धर्माच्या संपूर्ण विषय क्षेत्राचे गुरु होते.

त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे द्वितीय

त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे द्वितीय हे त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे यांचा 'तुल्कू' अवतार आहेत.

गेशे ङावंग धारग्ये

गेशे ङावंग धारग्ये हे भारतातील धरमशाला येथील लायब्ररी ऑफ तिबेटी वर्क्स अॅण्ड अर्काइव्ह येथे पाश्चात्त्यांसाठीच्या बौद्ध शिकवणीचे पथदर्शक गुरु आहेत.
Top