चोंखापा (१३५७-१४१९) हे तिबेटी बौद्ध धर्मातील महान सुधारक होते. त्यांनी मठांमधील अनुशासनाच्या काटेकोर पालनाचा आग्रह धरला. आणि बौद्ध दर्शन व तांत्रिक साधनेतील अनेक गूढ विषय स्पष्ट केले. त्यांच्यापासून सुरू झालेली गेलुग्पा परंपरा तिबेटमधील बौद्ध धर्माचं प्रमुख रूप बनली.