अद्ययावत अभ्यास

आपण जितक्या सखोलपणे बौद्ध शिकवणींचा अभ्यास करू तितकीचं आपली ध्यानधारणा आपल्या आयुष्यातील परिवर्तनासाठी परिणामकारक ठरेल. आपल्या मनाची रचना अत्यंत गुंतागुंतीची असल्यानं आपणास त्याला आनुषंगिक पद्धतींची गरज आहे. धर्माभ्यास सखोलपणे क्रमवार अशा पद्धतींचा परिचय घडवतो. एखाद्या सचित्र कोड्याचे विभिन्न भाग जोडून एक चित्र निर्माण करावं, तशा पद्धतीने आपण धर्माची विविध अंगे एकत्र आणून ती आपल्या दैनंदिन चिंतन आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून जीवनात अमलात आणू शकतो.
Top