शाक्यमुनि बुद्ध यांनी २५००हून अधिक वर्षांपूर्वी भारत आणि नेपाळच्या सीमाभागात आपलं आयुष्य व्यतीत केलं. आत्मानुभूती आणि दीर्घ ध्यानधारणेतून त्यांना सत्याच्या मूळ रूपाचा साक्षात्कार झाला. त्याच्या साहाय्याने त्यांनी स्वतःला मर्यादा आणि भ्रमांमधून मुक्त करत ज्ञानप्राप्ती साध्य केली. बुद्धांनी उर्वरित आयुष्य आपल्या अंतर्ज्ञानाचा वापर करत इतरांना त्यांच्या जीवनातील त्रासातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवण्यासाठी व्यतीत केलं.