गम्पोपा (१०७९-११५३) हे तिबेटी योगी मिलारेपा यांचे मुख्य शिष्य होते. गम्पोपा यांनी आपल्या मोक्षरत्नालंकार ग्रंथात चित्त स्थिरता प्रशिक्षणाला कदम्पा परंपरेतील मनोस्थितीबाबतच्या महामुद्रा शिकवणींची सांगड घातली. बारा दाग्पो काग्यू परंपरांचा उगम ते आणि त्यांचे शिष्य पगमौद्रूप यांच्यापासून झाल्याचे मानले जाते.