शाक्यमुनी बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपल्या पहिल्या उपदेशात चार आर्य सत्यांची शिकवण दिली. त्यांनी आपल्या उर्वरित जीवनात हे दर्शविले की चार आर्य सत्यांना आध्यात्मिक विकासासाठी उपयोगात आणण्यासाठी कशा रीतीने यथार्थाच्या बौद्ध परिप्रेक्ष्यांचे (दोन सत्ये) ज्ञान आणि त्याचे विश्लेषण करण्याची आवश्यकता असते आणि परम लक्ष्य व तिथेपर्यंत पोहचण्यासाठीच्या साधनांविषयीचा (बहुमूल्य त्रिरत्ने) स्पष्ट बोध आवश्यक असतो. एका छोट्याशा छंदात परमपूज्य दलाई लामांनी या तत्त्वांमधील प्रगाढ परस्परसंबंध स्पष्ट केला आहे. या छंदाचे विश्लेषण दर्शविते की प्रमुख बौद्ध शिकवणींच्या संबंधांतून कशा प्रकारे चिंतनशील मार्गाने सार्थक निष्कर्षापर्यंत पोहचणे शक्य आहे.