तिसरं आर्य सत्य: दुःखाचं खरं थांबणं

आपण जीवनात अनुभवत असणारी खरी दुःख आपल्या लक्षात आली आणि आपण त्यांची खरी कारणं ओळखली, आपल्याला खरोखरच त्यापासून मुक्त व्हायचं असेल, तर आपण ती पुन्हा उद्भवण्यापासून थांबवणं गरजेचं असतं. बुद्धाला त्याच्या अनुभवातून लक्षात आलेलं आणि ही दुःखं व त्यांची कारणं पुन्हा उद्भवणार नाहीत अशा रितीने त्यांना थांबवणं शक्य असल्याचं त्याने आपल्याला शिकवलं, हे तिसरं आर्य सत्य होय.

खरी दुःख आणि या खऱ्या दुःखांची खरी कारणं

आपल्याला जीवनात अनेक व्यक्तिगत समस्यांना सामोरं जावं लागत असलं, तरी दुःखांची पुनरावृत्ती आपण करत राहतो हे खरं दुःख आहे. दुःख आणि अनियंत्रितपणे चढ-उतार होणारं, समाधान न होणारं सुख यांचा अनुभव आपण टिकवून ठेवतो, आणि हे भावनिक चढ-उतार आपण ज्या मर्यादित शरीरांच्या व मनांच्या आधारे अनुभवतो ती शरीरं व मनं आपण टिकवून ठेवतो. ही खोटी गोष्ट टिकवून ठेवण्यासाठीची खरी कारणं आपल्या मनात असतात, हेसुद्धा बुद्धाने शिकवलं.

आपल्या वर्तनाचे आपल्यावर व इतरांवर कोणते परिणाम होतात आणि आपण, इतर सर्व व इतर घटिते कशा रितीने अस्तित्वात असतात याबद्दल आपली मनं भ्रामक प्रतिमा निर्माण करतात. आपण ‘मी’ म्हणून एका ठोस, स्वयंपूर्ण रूपात अस्तित्वात असतो, अशी आपण भ्रामक कल्पना करतो. आपली मनं ही ठोस रूपात असल्याची भ्रामक कल्पना आपण डोक्यात करतो आणि त्या रूपाशी जोडून घेतो, कारण आपल्या डोक्यात येणारा आवाज आपल्या मनाचा आहे असं आपल्याला वाटतं, किंवा गोष्ट समजून घेण्यासाठीचं व विचार करण्यासाठीचं उपकरण म्हणून आपण त्याकडे पाहतो. यातील कोणतीही प्रतिमा वास्तवाशी सुसंगत नाही, याबद्दल आपण अजाण असतो, इतकंच नव्हे तर या प्रतिमा वास्तवाशी सुसंगत असल्याचं आपण मानतो.

“कोणालाही मी आवडत नाही; कोणालाही माझी गरज नाही” असा विचार करून तुम्हाला स्वतःविषयी वाईट वाटलं आहे का? किंवा खूप तणावाखाली येऊन “मला आता गोष्टी सहन करता येत नाहीयेत; हे माझ्यासाठी खूपच आहे” असं तुम्हाला वाटलं आहे का? अर्थातच नाही. आपण स्वानुकंपा व दुःखात तळमळत असलो, तरी आपल्याला या भावना जाव्यात असंही तीव्रपणे वाटत असतं. या परिस्थितीची आपण कशी कल्पना करतो, यात समस्या असते. एखाद् रंगपुस्तकात दुःख काळ्या ढगासारखं असतं, ते स्वयंपूर्ण असतं व त्याभोवती ठळक रेषा असते, आणि हा ढग ‘माझ्या’वर टांगता असतो, स्वतः मीसुद्धा स्वयंपूर्ण असून भोवतीने ठळक रेषा आहे, असं ते वाटतं. हा फसवा देखावा- केवळ तसं जाणवतं म्हणून- वास्तवाशी सुसंगत आहे, असं मानून मग आपण अस्वस्थकारक भावना विकसित करतो, कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं अशी उत्कट इच्छा राखतो किंवा कोणीतरी आपल्यावर प्रेम करत नाही म्हणून संतापतो. कोणीतरी आपल्या सोबत वेल घालवावा किंवा आपल्याबाबत ममत्व दाखवावं, अशा अवाजवी मागण्या करण्याची उत्कट इच्छा या अस्वस्थकारक भावनांमुळे निर्माण होते. समोरच्या व्यक्तीने आपली मागणी मान्य केली, तरी आपण अनुभवलेलं कोणतंही अल्पकालीन सुख कधीच पुरेसं नसतं, आणि आपण अधिक मागणी करत राहतो, त्यातून दुःखी स्थिती टिकून राहते.

अशा प्रक्रियेत आपलं मन संभ्रमित होतं व झाकोळतं. आण सरळ विचार करत नाही, आणि आपलं वर्तन नियंत्रणाबाहेर जातं. पण संभ्रम हे मनाच्या स्वरूपाचा भाग आहे का? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण ‘मना’चा बौद्ध धर्मातील अर्थ काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. मन म्हणजे आपल्या डोक्यातली काही स्वयंपूर्ण गोष्ट नाही, तर मानसिक प्रक्रियेच्या संदर्भात या शब्दाचा वापर केला जातो. भिन्न परिस्थितींमध्ये भिन्न गोष्टी अनुभवायला मिळाल्याने मन सतत बदलत असते, पण त्याचं प्रचलित स्वरूप कायम तसंच राहतं. त्याचं खोलवरचं स्वरूपही कायम तसंच राहतं- अशक्य मार्गाने मन अस्तित्वात राहू शकत नाही.

आपलं मन अस्तित्वात असल्याची भ्रामक कल्पना आपण अनेक अशक्य मार्गांनी करवून घेतो. उदाहरणार्थ, ‘मी’ या ठोस रूपाशी किंवा अशा ‘मी’ वापरलेल्या एखाद्या गोष्टीच्या रूपात ठोसपणे मन अस्तित्वात आहे, असं आपण मानतो. यातील कोणतीही भ्रामक मतं मनाच्या प्रत्यक्ष स्वरूपाशी सुसंगत नसतात- या केवळ कल्पना असतात, त्यामुळे त्या मनाच्या स्वरूपाचा भाग नाहीत. या भ्रामक मतांवर आधारीत सर्व मनोवस्थाही मनाच्या स्वरूपाचा भाग नसतात. ‘मी’विषयीच्या गैरसमजुती, ‘मी’ सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात उद्भवणाऱ्या अस्वस्थकारक भावना, आणि या ‘मी’ला आधार देण्यासाठी निष्ळळ कृतीकरता आपल्याला उत्तेजित करणाऱ्या उत्कट इच्छा, यांचा समावेश या मनोवस्थांमध्ये होतो. यातील कोणतीही मनोवस्था मनाच्या स्वरूपाचा भाग नसतात व गैरसमजुतींवर आधारलेल्या असतात, त्यामुळे या गैरसमजुतींची जागा योग्य आकलनाने घेतल्यावर या गैरसमजुती कायमच्या काढून टाकता येतात. दुसऱ्या बाजूला, प्रेम व करुणा यांसारख्या रचनात्मक भावना मनाच्या स्वरूपाविषयीच्या गैरसमजुतींवर आधारलेल्या नसतात. या मोठ्या फरकामुळे अचूक आकलन त्यांना विस्थापित करू शकत नाही.

दुःखाचा खरा निरोध किंवा दुःख खऱ्या अर्थाने थांबवणं म्हणजे मनाचा निरोध नसतो. आपली मनं, त्यातील प्रेम, करुणा व अचूक आकलन हे गुण या जीवनकाळातून पुढील जीवनकाळात जात असतात. मर्यादित शरीर व मर्यादित मन यांच्यासह आपला अनियंत्रित पुनर्जन्म संपुष्टात येऊ शकतो, पण त्यासाठी अजाणपणा, अस्वस्थकारक भावना व उत्तेजित करणाऱ्या कर्मजन्य इच्छा यांच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं.

खऱ्या दुःखनिरोधाचे चार पैलू

तिसरं आर्य सत्य म्हणजे दुःख निरोध किंवा दुःख थांबवणं याचे चार पैलू आहेत.

  • एक, सर्व प्रकारचं दुःख चिरस्थायी करणारी खरी कारणं खऱ्या अर्थाने थांबवण्याचं काम यातून होतं. दुःखाचा कोणताही विशिष्ट प्रसंग आपोआप समाप्त होतो, कारण कार्यकारणभावाच्या प्रभावाखालील प्रत्येक गोष्ट अशाश्वत असते व अपरिहार्यरित्या थांबते. परंतु “खऱ्या अर्थाने थांबणं” याचा अर्थ असे प्रसंग पुन्हा कधीच घडणार नाहीत. मनाचं स्वरूप शुद्ध असल्यामुळे- या खऱ्या कारणांच्या पूर्ण अभावाच्या अर्थाने मन शुद्ध असतं- ही वस्तुस्थिती समजून घेतली तर, खऱ्या दुःखाला चिरस्थायी करण्यापासून मुक्ती नाही या गैरसमजुतीचा प्रतिकार करता येतो.
  • दोन, खऱ्या अर्थाने दुःख थांबणं ही शांततेची अवस्था असते, कारण सर्व अस्वस्थकारक मानसिक घटक शांत झालेले असतात. तीव्र क्षमतेचं वेदनाशामक औषध घेऊन काहीच जाणवत नसावं, अशा पूर्णपणे एकाग्रतेमध्ये गढून गेलेल्या मनस्थितीने आपल्या सर्व समस्या खऱ्या अर्थाने थांबतील, असं मानणं गैरसमजुतीचं असतं. अशा मनस्थितीत आपण कितीही काळ राहिलो, वेदना व दुःखापासून मुक्त राहिलो, तरी त्यातून आपल्या समस्यांची खरी कारणं दूर होत नाहीत. केवळ तात्कालिक शांतता लाभते. एकाग्रता संपते, औषधाचा अंमल कमी होतो आणि आपल्या समस्या परत येतात.
  • तीन, खऱ्या अर्थाने दुःख थांबणं ही श्रेष्ठ स्थिती असते. ऐहिक अवकाशातील इतर कोणत्याही प्राप्तीपेक्षा ती स्थिती श्रेष्ठ ठरते. आपण कितीही रमणीय आभासी जग निर्माण केलं व त्यात पळ काढला, तरी आपल्याला खऱ्या दुःखापासून पळ काढता येत नाही व दुःखाची कारणं लपवून ठेवता येत नाहीत. तथाकथित ‘वास्तव जगा’मधील आपल्या समस्या दूर झाल्यासारखं वाटतं आहे.
  • अखेरीस, दुःख खऱ्या अर्थाने थांबणं म्हणजे सर्व खऱ्या दुःखांमधून व त्यांच्या खऱ्या कारणांमधून अंशतः किंवा तात्पुरतं उभं राहणं नव्हे, तर ठामपणे उभं राहणं. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यांमध्ये व विविध स्तरांमध्ये होत असली तरी हे प्रसंग पुन्हा उद्भवणार नाहीत अशा रितीने त्यांचं संपूर्ण उच्चाटन करायला हवं. आपण स्वतः, इतर व सर्व गोष्टी खोलवर रुजलेल्या सवयी व प्रवृत्ती यांमधून बाहेर येतात. कारण, हे मनाच्या स्वरूपाचा भाग नाहीत. मन स्वभावतः शुद्ध असतं, त्यामुळे हे तडे ओझरते असतात.

सारांश

आपलं खरं दुःख टिकवण्यासाठीच्या खऱ्या कारणांपासून आपल्याला कायमची मुक्ती मिळवणं शक्य असतं, तेव्हा खऱ्या कारणांना कमी लेखून किंवा तात्पुरतं दुर्लक्षून काय होईल? या कारणांपासून कायमची मुक्ती घेण्यासाठी आपण काम करतो, तेव्हा खऱ्या कारणांची वारंवारता व तीव्रता टप्प्याटप्प्याने कमी व्हावी, ही आपली गरज असते. पण बुद्धाने निदर्शनास आणून दिल्यानुसार, आपण सर्व जण खऱ्या अर्थाने यातून बाहेर पडू शकतो. मग त्याहून कमी उद्दिष्ट कशाला ठेवा?

Top