मन म्हणजे काय?

What is mind

मन एखाद्या गोष्टीचा स्वतंत्र व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे, जो क्षणागणिक बदलत राहतो.

मनाची संकल्पना जटिल आहे आणि ती विविध भाषांमध्ये विविध प्रकारे मांडण्यात आली आहे. बौद्ध धर्मातील मनाची व्याख्या संस्कृतमधील चित्त संकल्पनेशी जोडलेली आहे आणि त्याचा अर्थही तितकाच व्यापक आहे. यात संवेदना, मूर्त आणि अमूर्त विचार, भावना, सुख-दुःखाची जाणीव, ध्यान, एकाग्रता, बुद्धी आणि अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. बौद्ध धर्मात मनाचा उल्लेख होतो, तेव्हा त्यात प्रत्येक प्रकारच्या मानसिक स्थितींचा समावेश असतो.

इथे भौतिक आधार केंद्रस्थानी नाही- जसे मेंदू, मज्जासंस्था, हार्मोन्स आणि इतर गोष्टी- किंवा रासायनिक वा विद्युकीय स्थितीही अंतर्भूत नाही. बौद्ध धर्म त्यांचे अस्तित्व अमान्य करत नाही, कारण त्या अर्थातच अस्तित्वात आहेत. आणि त्या अविभाज्यरित्या अंतर्भूत आहेत. इथे मनाचा संदर्भ एखाद्या अशा अर्थहीन गोष्टीशी सुद्धा नाही, जी मेंदू व्यापून टाकते आणि त्याचे कार्य नियंत्रित करते. बौद्ध धर्म मनाचा संबंध सामुहिक बेसावधता आणि सार्वभौम मन अशा संकल्पनांशीही जोडत नाही.

मानसिक कृती म्हणजे काय?

जर मन किंवा मानसिक कृती म्हणजे एखाद्या गोष्टीचा स्वतंत्र व्यक्तिनिष्ठ अनुभव असेल, तर रागासारख्या भावनांचा अर्थ काय आहे? इथे राग येणे आणि त्याची जाणीव होणे, एकाच वेळी घडणाऱ्या गोष्टी आहेत. इथे त्यांना एकाच घटनात्मक अनुभवात व्यक्त करण्यात आले आहे, जो निरंतर भावनिक अनुभूतीशी संबंधित आहे. कोणाचा अनुभव? जर मला राग आला असेल, तर तो माझा अनुभव आहे, तुझा नाही. पण इथे वेगळा ‘मी’ नाही, जो ‘मना’च्या मशिनवरचे रागाचे बटण दाबतो आहे- आपण फक्त अनुभवांच्या घटनेचा एक घटक आहोत.   


हे आपण एखादे सफरचंदासारखे काहीतरी पाहत असल्यासारखे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, आपल्या डोळ्यांच्या कोर्नियातून प्रकाश-किरण प्रवेश करत रेटिनाच्या दृष्टिपटलाच्या पेशींशी मिळतात. यातून विद्युकीय आवेगाच्या संप्रेरणातून मेंदूला आदेश मिळतात, आणि तिथे प्रक्रिया होते. हा व्यक्तिनिष्ठ अनुभव मेंदूतील सफरचंदाच्या मानसिक प्रतिबिंबातून निर्माण होतो आणि तोच ते पाहण्याचा अर्थ असतो. पण म्हणून मन म्हणजे काही मेंदूतील एखादी पोकळ जागा नव्हे जिथे हे मानसिक प्रतिबिंब निर्माण होते, ज्याची अभिव्यक्ती ‘मनात काहीतरी आहे’ सारख्या अनुभवातून स्पष्ट होते.

मानसिक प्रतिबिंबामध्ये आवाज, गंध, चव आणि शारीर जाणिवांची प्रतिबिंबेही असू शकतात, अगदी आपल्या स्वप्न आणि कल्पनांमधीलही. मानसिक प्रतिबिंबाची निर्मिती ही मेंदूच्या विविध भागातील हार्मोन्स स्रवल्याने निर्माण झालेल्या भावनांची आणि सुख-दुःखांच्या पातळीची जाणीव म्हणूनही वर्णन केली जाऊ शकते. कोणत्याही वेळेतील आपल्या मानसिक प्रतिबिंबाचा विषय हा अनेक घटकांचा व्यामिश्र अनुभव असू शकतोः एखादे दृश्य किंवा विचारांशी जोडल्या गेलेल्या भावनांचा अनुभव, अधिक सुख किंवा दुःखाची पातळी.    

मज्जासंस्थाविषयक शास्त्र आणि बौद्ध धर्म

१९८७मध्ये दलाई लामा आणि चिलीचे मज्जासंस्थातज्ज्ञ फ्रान्सिस्को वरेला यांच्यातर्फे माइंड अण्ड लाइफ संस्थेची स्थापना झाल्यापासून आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक दल आणि सिद्धीप्राप्त बौद्ध गुरू मन आणि मेंदुदरम्यानच्या परस्परसंबंधांचे दुवे शोधत आहेत. यात मज्जासंस्थातज्ज्ञांनी नव्या आणि अनुभवी अशा दोन्ही साधकांच्या मनस्थितीचे निरीक्षण केले आणि त्यातून शोध लावला की निरंतर ध्यानधारणेतून मेंदुतील मज्जासंस्थांच्या अस्थिरतेवर प्रभाव पडतो आणि त्यातून एकाग्रता आणि करुणेसारख्या सकारात्मक भावनांच्या निर्मितीसाठी उपकारक मस्तिष्कमार्गिका तयार होतात.

आत्तापर्यंत पाश्चिमात्त्य विज्ञान आणि बौद्ध धर्मातील शोधांनी परस्परांना परिपूर्णता देत समृद्ध केले आहे, आणि हे बौद्ध गुरू आणि प्रख्यात वैज्ञानिकांमधील संयुक्त उपक्रम दलाई लामा ज्याला- २१व्या शतकातील बौद्ध धर्म संबोधतात त्याचे प्रतिक आहेत.  

जीवन अनुभवण्याच्या मानसिक कृतीला बौद्ध धर्म ‘मन’ मानतो. ही क्रिया दर क्षणी बदलत राहते आणि नेहमी विविध मानसिक घटकांनी व्यापलेली असते. बौद्ध धर्म आपल्याला शिकवण देतो की आयुष्याने आपल्या पुढ्यात ठेवलेल्या अनुभवांचे आपण बळी नसून आपल्या जीवनात आपण काय अनुभव करतो, त्यात आपली महत्त्वाची भूमिका असते. मनाच्या प्रशिक्षणाने आपण आपल्या अनुभवांना आपल्या भल्यासाठी परावर्तित करू शकतो आणि शाश्वत प्रयत्नांनतर तो सकारात्मक बदल कोणत्याही विशेष प्रयत्नांशिवाय विनासायास घडत राहतो.

Top