श्रेणीबद्ध मार्गाची ओळख

अनेकदा सांगितले जाते की बुद्धांनी ८४००० शिकवणी सांगितल्या होत्या, त्यांनी सांगितलेल्या शिकवणी विषय आणि व्यापकतेच्या दृष्टीने विविधांगी आणि विस्तारपूर्ण होत्या. सुत्रांच्या वाचनातून आपल्याला लाभ होत असला तरी शिकवणींचे सार समजून घेऊन त्यांचा यथार्थ लाभ घेणे कठीण आहे. या सदरात आपण पाहणार आहोत की कशी रीतीने भारतीय आणि तिबेटी गुरूंनी बुद्धांच्या संपूर्ण शिकवणींचे संगतवार वर्गीकरण करून, ज्याला तिबेटी भाषेत ‘लाम-रिम’ संबोधले जाते, त्याचे नेटके संकलन करून ठेवले आहे, ज्याचा अंगीकार करून आपण ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरील प्रवास सुरू करू शकतो.

Top