आध्यात्मिक विद्यार्थी-शिक्षक संबंधांबद्दल अनुभवजन्य तथ्ये
आध्यात्मिक विद्यार्थी शिक्षक नात्यातील गोंधळ टाळण्यासाठी आपण काही अनुभवजन्य तथ्ये समजून घेणे आवश्यक आहे:
- जवळजवळ सर्व आध्यात्मिक साधक आध्यात्मिक मार्गावर टप्प्याटप्प्याने प्रगती करतात.
- बहुतांश साधक जीवनकाळात विविध शिक्षकांकडून शिक्षा घेतात आणि प्रत्येकासोबत वेगवेगळे संबंध प्रस्थापित करतात.
- प्रत्येक आध्यात्मिक शिक्षक सम पातळीवर पोहचलेले नसतात.
- विशिष्ट साधक आणि विशिष्ट शिक्षक यांच्यातील संबंधाचा प्रकार प्रत्येकाच्या आध्यात्मिक स्तरावर अवलंबून असतो.
- आध्यात्मिक मार्गाने प्रवास करत असताना लोक सहसा त्यांच्या शिक्षकांशी उत्तरोत्तर सखोल रीतीने जोडले जातात.
- कारण एकच शिक्षक प्रत्येक साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भिन्न भूमिका बजावू शकतो, प्रत्येक साधकाचा त्या शिक्षकाशी असलेला सर्वात योग्य संबंध भिन्न असू शकतो.
आध्यात्मिक शिक्षक आणि आध्यात्मिक साधकांच्या पातळ्या
आध्यात्मिक शिक्षक आणि आध्यात्मिक साधकांच्या खालीलप्रमाणे अनेक पातळ्या आहेत:
- बौद्ध प्राध्यापक, जे विद्यापीठातल्याप्रमाणे माहिती पुरवतात
- धर्म प्रशिक्षक, धर्माचा जीवनातील अंगीकार शिकवतात
- ध्यानधारणा प्रशिक्षक, ताई-ची किंवा योगसमान पद्धती शिकवतात
- आध्यात्मिक मार्गदर्शकांचे ते देत असलेल्या विविध प्रतिज्ञांच्या पातळीवर वर्गीकरण केले जाते, उदाहरणार्थ सामान्य वा साधूंसाठीच्या प्रतिज्ञा, बोधिसत्व प्रतिज्ञा आणि तांत्रिक प्रतिज्ञा
तसेच, इथे काही जण असतात जे:
- बौद्ध धर्माचे विद्यार्थी, ज्यांना माहिती मिळवण्यात रस आहे
- धर्म शिकवण घेणारे विद्यार्थी ज्यांना जीवनात धर्माचा अंगीकार कसा करायचा, हे शिकण्याची इच्छा आहे.
- ध्यान प्रशिक्षणार्थी, ज्यांना मन सुस्थितीत आणि प्रशिक्षित ठेवण्याच्या पद्धती शिकायच्या आहेत.
- शिष्य, जे भविष्यातील जीवन सुधारण्याची, मुक्ती मिळवण्याची आणि ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगतात.
प्रत्येक स्तराची स्वतःची पात्रता असते आणि एक आध्यात्मिक साधक म्हणून आपण आपली स्वतःची आणि शिक्षकाची पार्श्वभूमी विचारात घेणे आवश्यक आहे – आशियाई किंवा पाश्चात्य, भिक्खु, भिक्खुणी किंवा सामान्य माणूस, शैक्षणिक स्तर, परिपक्वतेची भावनिक आणि नैतिक पातळी, वचनबद्धतेची पातळी, आणि इतर. म्हणून, सावकाश आणि काळजीपूर्वक पुढे जाणे महत्वाचे आहे.
संभाव्य शिष्याची आणि संभाव्य आध्यात्मिक शिक्षकाची पात्रता
एक संभाव्य शिष्य या नात्याने, आपण आपल्या स्वतःच्या विकासाची पातळी तपासणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपण ज्या नात्यासाठी तयार नाही त्याच्याशी आपण बांधील राहणार नाही. शिष्याला आवश्यक असलेले मुख्य गुण खालीलप्रमाणे आहेतः
- स्वतःच्या कल्पना आणि मतांना चिकटून न राहता मनाचा मोकळेपणा असणे
- योग्यायोग्यतेतील फरक ओळखण्यासाठी आवश्यक सामान्य समज
- धर्माचरणात तीव्र रस आणि त्यासाठी योग्य शिक्षित शिक्षकाचा शोध
- धर्म आणि प्रशिक्षित शिक्षकाबद्दल आदर आणि सन्मान
- जागृत मन
- भावनिक प्रगल्भता आणि स्थैर्यासाठी आवश्यक मूलभूत पातळी
- नैतिक जबाबदारीची मुलभूत जाणीव
शिक्षकाच्या पातळीनुसार, त्याला किंवा तिला अधिक गुणांची आवश्यकता असते. साधारणतः त्यातील मुख्य गुण खालीलप्रमाणे आहेत:
- स्वतःच्या आध्यात्मिक गुरुंशी सदृढ नातं
- धर्माचे शिष्याहून अधिक ज्ञान
- दैनंदिन व्यवहार आणि ध्यानधारणेत वापरायच्या पद्धतींबाबत विशिष्ट पातळीवरील यश आणि अनुभव
- दैनंदिन जीवनातील धर्माचरणाच्या फायदेशीर परिणामांचे उदाहरण प्रस्थापित करण्याची क्षमता. अर्थात खालील गोष्टींच्या क्षमताः
- नैतिक स्वयंशिस्त
- सरासरी भावनिक प्रश्नांतून मुक्ती मिळवण्यावर आधारलेली भावनिक प्रगल्भता आणि स्थैर्य
- विद्यादानाचे प्राथमिक प्रेरणास्थान म्हणून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक काळजी
- विद्यादानातील संयम
- ढोंगाचा अभाव (त्याच्यात किंवा तिच्यात नसलेल्या गुणांची बतावणी न करणे) आणि ढोंगीपणाचा अभाव (त्याच्या किंवा तिच्यातील दोष लपवू नका, जसे ज्ञान वा अनुभवाचा अभाव)
आपल्या शहरात उपलब्ध असलेल्या शिक्षकांच्या पात्रतेचा स्तर, आपल्याकडील उपलब्ध वेळ, वचनबद्धता, आपली आध्यात्मिक उद्दिष्टे आणि अशा इतर वास्तविकतेशी आपण जुळवून घेणे आवश्यक असते. आध्यात्मिक नातेसंबंध जोडण्याआधी एखाद्या संभाव्य शिक्षकाची पात्रता तपासली, तर शिक्षकाला देव किंवा भूत बनवण्याच्या टोकाच्या गोष्टी आपण टाळू शकतो. जेव्हा आपण आध्यात्मिक गुरुला देव बनवतो, तेव्हा आपला भोळेपणा संभाव्य गैरवर्तनासाठी धोकादायक ठरतो. जर आपण आध्यात्मिक गुरुला भूत बनवतो, तेव्हा असे विडंबनात्मक वर्तन आपल्याला संभाव्य लाभापासून वंचित राखते.
आध्यात्मिक गुरुचा शिष्य बनणे आणि मानसोपचारतज्ज्ञाचा रुग्ण बनणे यातील फरक
आध्यात्मिक विद्यार्थी-शिक्षक नातेसंबंधातील गोंधळाचे एक प्रमुख कारण म्हणजे आध्यात्मिक गुरूने एखाद्या मानसोपचारतज्ज्ञासारखे असावे अशी इच्छा बाळगणे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यभर भावनिक आनंद आणि चांगले नातेसंबंध मिळवायचे आहेत. हे ध्येय साध्य करण्यासाठी आध्यात्मिक गुरुचे शिष्य बनणे हे अनेक मार्गांनी त्याच उद्देशासाठी मानसोपचारतज्ज्ञाचा रुग्ण बनण्यासारखे आहे.
बौद्ध धर्म आणि उपचार दोन्हीः
- आपल्या जीवनातील वेदनेची जाणीव होणे आणि ती नष्ट करण्याची इच्छा असणे
- कोणाच्या तरी मदतीने आपल्या समस्या आणि त्याची कारणे ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी प्रयत्न करणे. समज हीच आत्मपरिवर्तनाची गुरुकिल्ली असल्याच्या बौद्ध तथ्याशी अनेक उपचार पद्धती सहमत असल्याचे दिसते.
- आपल्या समस्यांची कारणे सखोलपणे समजून घेणे, या घटकांवर काम करण्यासाठी व्यावहारिक पद्धतींवर काम करणाऱ्या परंपरा आणि दोन दृष्टिकोनांच्या संतुलित संयोजनाची शिफारस करणाऱ्या प्रणाली यावर भर देणाऱ्या विचारसरणीचा स्वीकार करा.
- आत्मविकासाच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग म्हणून गुरु किंवा मानसोपचारतज्ज्ञाशी सुदृढ भावनिक नाते प्रस्थापित करा
- जरी बहुतेक शास्त्रीय पद्धती रुग्णाचे वर्तन आणि विचार करण्याच्या पद्धती सुधारण्यासाठी नैतिक मार्गदर्शक तत्त्वे वापरण्यात टाळाटाळ करतात, तरीही काही उत्तर शास्त्रीय शाळा बौद्ध धर्माप्रमाणेच नैतिक तत्त्वांचे समर्थन करतात. अशा तत्त्वांमध्ये अकार्यक्षम कुटुंबातील सर्व सदस्यांप्रती समान न्याय असणे आणि क्रोधासारख्या विध्वंसक आवेगांपासून दूर राहणे यांचा समावेश होतो.
कितीही साम्यं आढळली तरी बौद्ध गुरुचा शिष्य होणे आणि मानसोपचारतज्ज्ञाचा रुग्ण होणे यात पाच महत्त्वपूर्ण फरक आहेत:
१.ज्या टप्प्यावर नातेसंबंध प्रस्थापित होतात असा भावनिक टप्पा. भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असताना संभाव्य व्यक्ती सामान्यतः थेरपिस्टकडे जातात. ते मनोविकार देखील असू शकतात आणि उपचाराचा भाग म्हणून त्यांना औषधांची आवश्यकता असते. याउलट, संभाव्य शिष्य त्यांच्या आध्यात्मिक मार्गावरील पहिले पाऊल म्हणून गुरूशी संबंध प्रस्थापित करत नाहीत. याआधी, त्यांनी बुद्धाच्या शिकवणींचा अभ्यास केलेला असतो आणि स्वतःवर कार्य करण्यास सुरुवात केलेली असते. परिणामी, ते भावनिक परिपक्वता आणि स्थिरतेच्या पुरेशा स्तरावर पोहोचलेले असतात, जेणेकरून त्यांनी प्रस्थापित केलेले शिष्य-गुरू नातेसंबंध या संज्ञेच्या बौद्ध अर्थाने रचनात्मक असेल. दुसऱ्या शब्दांत, बौद्ध शिष्यांनी आधीच मानसिक कमजोरीची वृत्ती आणि वर्तनापासून मुक्त असणे आवश्यक आहे.
२. नातेसंबंधात अपेक्षित संवाद. संभाव्य रुग्ण व्यक्तींना कोणीतरी त्यांचे ऐकून घ्यावे असे वाटत असते. म्हणून, ते थेरपिस्टने त्यांच्याकडे आणि त्यांच्या वैयक्तिक समस्यांकडे एकाग्रतेने लक्ष देण्याची अपेक्षा करतात, जरी सामूहिक उपचार पद्धतीचा वापर करीत असले तरीही. दुसरीकडे, शिष्य सामान्यतः त्यांच्या गुरुंसोबत वैयक्तिक समस्यांविषयी बोलत नाहीत आणि वैयक्तिक लक्ष देण्याची अपेक्षा किंवा मागणी करत नाहीत. त्यांनी वैयक्तिक सल्ल्यासाठी गुरुचा सल्ला घेतला तरी ते नियमित जात नाहीत. नातेसंबंधातील मुख्य लक्ष हे बौद्ध शिकवणींच्या श्रवणावर आहे. प्रत्येकाला भेडसावणाऱ्या सामान्य समस्यांवर मात करण्यासाठी बौद्ध शिष्य प्रामुख्याने त्यांच्या गुरुंकडून पद्धती शिकतात. त्यानंतर ते त्यांच्या विशिष्ट परिस्थितींमध्ये पद्धती लागू करण्याची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारतात.
३. कामकाजाच्या संबंधातून अपेक्षित परिणाम. थेरपीचा उद्देश आपल्या जीवनातील समस्या स्वीकारणे आणि त्यासह जगणे शिकणे किंवा त्या कमी करणे जेणेकरून त्या सहन करण्यायोग्य बनतील. जर आपण या एका आयुष्यभरासाठीच्या भावनिक कल्याणाच्या उद्देशाने बौद्ध आध्यात्मिक गुरुकडे गेलो तर आपणही आपल्या समस्या कमी करण्याची अपेक्षा करू शकतो. जीवन कठीण असले तरी बुद्धांनीही शिकवलेल्या आर्य सत्यानुसार आपण आयुष्य सोपे करू शकतो.
तथापि, आपले जीवन भावनिकदृष्ट्या सोपे बनवणे ही केवळ शास्त्रीय बौद्ध मार्गाकडे जाण्याची एक प्राथमिक पायरी आहे. आध्यात्मिक गुरुंचे शिष्य किमान अनुकूल पुनर्जन्म, मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीच्या मोठ्या उद्दिष्टांवर लक्ष ठेवतील. शिवाय, बौद्ध शिष्यांना बौद्ध धर्मात स्पष्ट केल्याप्रमाणे पुनर्जन्माची बौद्धिक समज असेल आणि त्याच्या अस्तित्वाची किमान तात्पुरती मान्यता असेल. थेरपी क्लायंटना त्यांच्या तात्काळ परिस्थितींमध्ये सुधारणा करण्यापलीकडे पुनर्जन्म किंवा उद्दिष्टांबद्दल विचार करण्याची गरज नाही.
४. आत्म-परिवर्तनासाठी वचनबद्धतेची पातळी. थेरपिस्टचे क्लायंट एक तासाचे शुल्क देतात, परंतु वृत्ती आणि वागणूक बदलण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करत नाहीत. दुसरीकडे, बौद्ध शिष्य शिकवणीसाठी पैसे मोजेल किंवा मोजणारही नाही; तरीसुद्धा, ते औपचारिकपणे जीवनात त्यांची दिशा बदलतात. सुरक्षित आश्रय घेताना, शिष्य आत्म-विकासाच्या मार्गात स्वत: ला वचनबद्ध करताना बुद्धांनी अंगीकारलेला मार्ग, त्यांची शिकवण आणि उच्च आध्यात्मिक समुदायांने अनुसरण करायला हवे, अशा मार्गाशी स्वतःला वचनबद्ध करतात.
शिवाय, बौद्ध शिष्य जीवनातील कृती, वाणी आणि विचार करण्याच्या नैतिक, रचनात्मक मार्गासाठी स्वतःला वचनबद्ध करतात. ते शक्य तितके, विध्वंसक गोष्टी टाळण्याचा आणि त्याऐवजी रचनात्मक गोष्टींमध्ये गुंतण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा शिष्य अनियंत्रित पुनर्जन्माच्या आवर्ती समस्यांपासून मुक्तीची मनापासून इच्छा करतात, तेव्हा ते औपचारिकपणे सामान्यतः किंवा मठातील शपथ घेऊन आणखी मजबूत वचनबद्धता करतात. आत्म-विकासाच्या या टप्प्यावर शिष्य जीवनासाठी नेहमीच विशिष्ट आचार पद्धतींपासून प्रतिबंधित राहण्याचे व्रत जोपासतात, जे एकतर नैसर्गिकरित्या विनाशकारी आहेत किंवा ज्या विशिष्ट लोकांना विशिष्ट हेतूंसाठी टाळण्याची शिफारस बुद्धाने केली आहे. एक उदाहरण म्हणजे मठवासींनी आसक्ती कमी करण्यासाठी लेप पोशाख सोडून त्याऐवजी वस्त्र परिधान करणे. पूर्ण मुक्तीची इच्छा विकसित करण्याआधीही, शिष्य अनेकदा सामान्यतः किंवा मठातील शपथ घेतात.
दुसरीकडे, थेरपिस्टचे क्लायंट, उपचारात्मक कराराचा भाग म्हणून प्रक्रियेच्या काही नियमांचे पालन करण्यास सहमत असतात, जसे की पन्नास-मिनिटांच्या भेटीचे वेळापत्रक पाळणे. हे नियम मात्र उपचारादरम्यानच लागू होतात. ते उपचारात्मक चौकटीच्या बाहेर संपूर्ण आयुष्यासाठी लागू होत नाहीत, नैसर्गिकरित्या विनाशकारी वर्तनापासून परावृत्त होत नाहीत.
५. शिक्षक किंवा थेरपिस्ट बद्दल वृत्ती. शिष्य त्यांच्या आध्यात्मिक गुरुंकडे ते जे मिळवण्याचा प्रयत्न करतात त्याचे जिवंत उदाहरण म्हणून पाहतात. मार्गदर्शकांच्या चांगल्या गुणांच्या योग्य ओळखीच्या आधारावर ते त्यांना मानतात आणि ते ज्ञानाच्या त्यांच्या श्रेणीबद्ध मार्गावर हा दृष्टिकोन राखतात आणि मजबूत करतात. याउलट, क्लायंट त्यांच्या थेरपिस्टना भावनिक आरोग्यासाठी मॉडेल मानू शकतात, परंतु त्यांना थेरपिस्टच्या चांगल्या गुणांची योग्य जाणीव असणे आवश्यक नसते. थेरपिस्टसारखे बनणे हे नातेसंबंधाचे उद्दिष्ट नाही. उपचारादरम्यान, थेरपिस्ट त्यांच्या ग्राहकांना आदर्शांच्या कल्पनेच्याही पुढे नेतात.
‘शिष्य’ संज्ञेचा अयोग्य वापर
काहीवेळा, लोक स्वतःला आध्यात्मिक गुरूंचे शिष्य म्हणवून घेतात, पण ते, त्यांचे गुरु किंवा दोघेही त्या संज्ञाचा नेमका अर्थ उमजून घेण्यात कमी पडतात. त्यांचा हा भोळेपणा त्यांना अनेकदा अवास्तव अपेक्षा, गैरसमज, दुखावलेल्या भावना आणि गैरवर्तनाकडे नेतो. या संदर्भात, गैरवर्तनाला बळी पडणे म्हणजे लैंगिक, भावनिक, आर्थिक शोषणाला किंवा एखाद्याच्या शक्तीप्रदर्शनाला बळी पडणे असा अर्थ होतो. पाश्चिमात्य देशांत आढळणाऱ्या तीन सामान्य प्रकारच्या छद्म-शिष्यांचे आपण परीक्षण करू या, ज्यांना विशेषत: आध्यात्मिक गुरुंच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
१. काही लोक आपल्या अवास्तक कवीकल्पनेच्या पूर्ततेसाठी धर्म केंद्रात येतात. त्यांनी "रहस्यमय पूर्व" किंवा सुपरस्टार गुरूंबद्दल काहीतरी वाचले किंवा ऐकलेले असते आणि त्यांना त्यांचे रटाळ आयुष्य उत्कंठावर्धक करायची इच्छा असते. ते आध्यात्मिक शिक्षकांना भेटतात आणि ताबडतोब स्वतःला शिष्य असल्याचे घोषित करतात, विशेषत: जर शिक्षक कफनी घातलेले आशियाई असतील. कफनी न घालणाऱ्या पण आशियाई पदव्या किंवा नावे असलेल्या पाश्चात्य शिक्षकांसमोरही ते तितकेच शरण जाण्याची शक्यता असते.
अशा गूढ शास्त्राच्या शोधामुळे साधकांचे आध्यात्मिक शिक्षकांशी असलेले नातेसंबंध दुबळे होतात. त्यांनी स्वतःला योग्यरित्या पात्र मार्गदर्शकांचे शिष्य घोषित केले तरीही, जेव्हा त्यांना समजते की त्यांच्या कल्पनांशिवाय अलौकिक काहीही घडत नाही, तेव्हा ते अशा गुरुंना सोडून देतात. शिवाय, "त्वरित शिष्य" ची अवास्तव वृत्ती आणि अपेक्षा अनेकदा त्यांच्यातील क्षमतांना झाकोळून टाकते. अशा व्यक्ती विशेषत: हुशार, पण धूर्त आध्यात्मिक लोकांकडून सहजतेने फसवले जाऊ शकतात.
२.इतर भावनिक किंवा शारीरिक वेदनांनी हताश झालेले वेदनांवर मात करण्यासाठी मदतीच्या अपेक्षेने केंद्रांमध्ये येऊ शकतात. त्यांनी विविध प्रकारच्या थेरपीचा प्रयत्न केलेला असतो, परंतु काही उपयोग झालेला नसतो. आता, ते जादुई चमत्कारिक उपचार शोधतात. ते स्वतःला अशा कोणाचाही शिष्य म्हणून घोषित करू शकतात जो त्यांना आशीर्वादाची गोळी देऊ शकेल, त्यांना विशेष प्रार्थना किंवा मंत्र पठन करायला सांगेल किंवा त्यांना विशिष्ट प्रार्थनांचा प्रचंड सराव करण्याचा उपदेश देईल – जसे की लाखो साष्टांग नमस्कार – ज्यामुळे त्यांच्या समस्या आपोआप दूर होतील. ते विशेषतः त्याच प्रकारच्या शिक्षकांकडे वळतात जे जादूच्या शोधात असलेल्या लोकांना मोहित करतात. अगदी योग्य गुरुच्या सल्ल्याने जरी चमत्कारिक उपचार केलेले असले, तरी चमत्कार शोधणार्यांची "फिक्स-इट" मानसिकता बर्याचदा निराशा आणि निराशेलाच कारणीभूत ठरते. अशी "फिक्स-इट" मानसिकता देखील आध्यात्मिक क्षुद्रांकडून होणाऱ्या गैरवर्तनला आकर्षित करू शकते.
३. तरीही इतर लोक, विशेषत: निराश, बेरोजगार युवक, अस्तित्त्वात्मक सशक्तीकरण प्राप्त करण्याच्या आशेने सांस्कृतिक पंथांच्या धर्म केंद्रांमध्ये येतात. "आध्यात्मिक फॅसिस्ट" माध्यमांचा वापर करून करिष्माई फसवे, अतिशहाणे त्यांना आकर्षित करतात. ते त्यांच्या तथाकथित शिष्यांना त्यांच्या पंथांवर पूर्ण निष्ठा ठेवल्यास संख्याबळाचे वचन देतात. ते त्यांच्या शत्रूंना, विशेषत: कनिष्ठ, अशुद्ध बौद्ध परंपरांच्या अनुयायांचा नाश करणार्या भयंकर संरक्षकांच्या नाट्यमय वर्णनाने शिष्यांना आकर्षित करतात. त्यांच्या चळवळींच्या संस्थापकांच्या अलौकिक शक्तींच्या भव्य कथांसह, ते एका पराक्रमी नेत्याच्या शिष्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात जो त्यांना आध्यात्मिक पात्रतेच्या स्थानावर नेईल. या अभिवचनांना प्रतिसाद देऊन, असे लोक त्वरीत स्वतःला शिष्य घोषित करतात आणि हुकूमशहा गुरु त्यांना जे काही निर्देश किंवा आदेश देतात त्याचे आंधळेपणे पालन करतात. परिणाम सहसा विनाशकारी असतात.
सारांश
थोडक्यात, ज्याप्रमाणे बौद्ध केंद्रात शिकणारा प्रत्येकजण अस्सल आध्यात्मिक गुरु नसतो, त्याचप्रमाणे केंद्रात शिकणारा प्रत्येकजण अस्सल आध्यात्मिक शिष्य नसतो. आपल्याला गुरु आणि शिष्य या दोन्ही शब्दांचा अचूक वापर हवा आहे. यासाठी आध्यात्मिक प्रामाणिकपणा आणि ढोंगाचा अभाव आवश्यक आहे.