सरकाँग रिंपोछे यांचा तांत्रिक उपासकांना सल्ला
“अर्ध-वेळ” तांत्रिक साधना करणं दीर्घ काळासाठी पूर्ण-वेळ तांत्रिक साधनेकरिता एकांतवासात जाणं लाभदायक असलं, तरी हा पर्याय स्वीकारण्याची चैन बहुतांश लोकांना परवडत नाही. त्यामुळे आपल्याकडे तीन महिने किंवा अधिक मोकळा वेळ असेल तरच अशा प्रकारची एकांतवासातील साधना आपल्याला करता येईल,...