परम पूजनीय चौदाव्या दलाई लामांच्या प्रमुख शिक्षकांपैकी एक असलेले त्सेनझाब सरकाँग रिंपोछे हे डॉ. बर्झिन यांचेही प्रमुख शिक्षक होते. त्यांची नम्र वागणूक, व्यावहारिक दृष्टिकोन आणि उत्तम विनोदबुद्धी यांमुळे तिबेटी विद्यार्थ्यांप्रमाणेच पाश्चात्त्य विद्यार्थ्यांमध्येही ते तितकेच लोकप्रिय होते. तिबेटी बौद्ध धर्माच्या सर्व परंपरांमध्ये प्रवीण असलेल्या सरकाँग यांच्यात विद्वान अभ्यासकाच्या, परिपूर्ण उपासकाच्या आणि कुशल, करुणामय शिक्षकाच्या सर्वोच्च गुणांचा समुच्चय झालेला होता. त्यांचा निकटवर्तीय शिष्य, दुभाषी व इंग्रजी सचिव म्हणून त्यांच्यासोबत नऊ वर्षं व्यतित केलेल्या डॉ. बर्झिन यांनी रिंपोछे यांच्याविषयीच्या वैयक्तिक आठवणी इथे नोंदवल्या आहेत.