प्राथमिक नोंदी
बौद्ध धर्माच्या मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी सर्व बौद्ध परंपरा आध्यात्मिक गुरुचे महत्त्व अधोरेखित करतात. आध्यात्मिक गुरु हे काही फक्त खालील गोष्टी विशद करत नाहीतः
- माहिती देणे
- प्रश्नांची उत्तरे देणे
- शिष्याची समज तपासणे
- शिष्याचा बौद्धिक, भावनिक आणि ध्यानधारणा विकास तपासणे.
आध्यात्मिक गुरु याही गोष्टी करतात:
- शपथ देणे आणि सशक्तीकरण करणे.
- आदर्श घालून देणे.
- वैयक्तिक उदाहरणातून प्रेरणा देणे.
- बुद्ध परंपरेकडे परतण्याचा दुवा म्हणून काम करणे.
गुरु आणि शिष्याचे विविध स्तर असतात आणि अशाच रीतीने या मार्गाशी जोडले जाण्याचेही अनेक मार्ग असतात.
सांस्कृतिक संदर्भ
आध्यात्मिक गुरुकडून शिक्षण मिळवण्याची आधुनिक पाश्चिमात्य स्थिती परंपरागत आशियाई स्थितीपेक्षा पूर्णतः भिन्न आहे.
परंपरागत आशियामध्ये बहुतांश शिष्य:
- भिक्खु किंवा भिक्खुणी असत, जे पूर्णवेळ आध्यात्मिक मार्गाशी बांधील असायचे
- धर्माभ्यास आणि धर्मसरावाशिवाय इतर कोणतीही महत्त्वाची कृती करत नसत
- शिक्षणाचा प्रारंभ न झालेल्या बाल्यावस्थेपासूनच बौद्ध शिक्षणाचा अभ्यास सुरू करत असत
- परिणामी मोठेपणी त्यांच्याकडे गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान यासारख्या मोजक्या प्रशिक्षणविषयक विषयाचेच शिक्षण असे
- पारंपरिक आशियाई समाजांतील स्त्रियांच्या भूमिकेबद्दल आणि अधिकार संरचनांच्या दृष्टिकोनाबाबतची मूल्ये स्वीकारत – स्त्रिया कनिष्ठ आहेत आणि पदानुक्रम हे सर्वसामान्य प्रमाण आहेत.
आधुनिक पश्चिम जगतातील बहुतांश विद्यार्थी:
- स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जगण्यात व्यग्र असलेले सामान्य लोक आहेत
- धर्मासाठी त्यांच्याकडे फार थोडा वेळ आहे.
- शिक्षित प्रौढ म्हणून धर्माचा अभ्यास सुरू करतात
- लौंगिक समता आणि लोकशाहीवादी सामाजिक धाटणीची मागणी करतात
आध्यात्मिक गुरुंच्या आर्थिक बाबींच्या दृष्टीने विचार केल्यास, पारंपरिक आशियाई आध्यात्मिक गुरुंना समाजाकडून आर्थिक पाठिंबा मिळू शकत असे. त्यांचे शिष्य नसलेल्या लोकांकडूनही त्यांना दक्षिणा मिळत असे. आधुनिक पाश्चिमात्य देशात, आध्यात्मिक गुरुंनी आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. अनेकजण आर्थिक, संघटनात्मक आणि प्रशासकीय चिंतांसह धर्म केंद्र चालवतात.
या सर्व घटकांचा गुरु-शिष्य संबंधांवर परिणाम होतो. अनेक आध्यात्मिक साधकांना फायदा झाला आहे, परंतु इथे बरेच गैरसमज, अनेक चुका आणि आध्यात्मिक जखमा देखील झालेल्या पाहायला मिळतात.
धोके
तिबेटी परंपरेच्या संदर्भात, "गुरु-भक्ती" सारख्या ग्रंथांद्वारे धोके वाढवले गेले आहेत. अशा ग्रंथांचे श्रोते प्रतिबद्ध असलेले भिक्खु आणि भिक्खुणी होते, ज्यांना तांत्रिक सक्षमीकरणाच्या तयारीसाठी पुनरावलोकनाची आवश्यकता होती. बौद्ध धर्माबद्दल काहीही माहिती नसलेल्या धर्म केंद्रातील नवशिक्यांसाठी सूचना कधीच अभिप्रेत नव्हत्या.
आपल्याला दोन अतिरेक टाळायला हवेत:
- भोळसटपणा आणि अत्याचाराचे दरवाजे खुले करून आध्यात्मिक गुरुंचे दैवतीकरण
- मानसिक आजाराचे दरवाजे खुले करून आणि सखोल प्रेरणा व लाभ मिळवण्याचे दरवाजे बंद करत आध्यात्मिक गुरुंचे राक्षसीकरण करणे
अपारंपरिक चिकित्सा पद्धती
मी या समस्येचे विश्लेषण केले आहे आणि आध्यात्मिक गुरुंशी संबंधित: निरोगी नातेसंबंधांची उभारणी (इथाका: स्नो लायन, २०००) या लेखाच्या मांडणीत नातेसंबंध निरोगी करण्याचे मार्ग सुचवले आहेत. या प्रश्नाच्या विश्लेषणासाठी मी आणखी एक अपारंपरिक योजना सादर करू इच्छितो, जी कौटुंबिक थेरपी आणि संदर्भित थेरपीच्या संस्थापकांपैकी एक, हंगेरियन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. इव्हान बोझोर्मेनी-नागी यांच्या कार्यातून सुचलेली आहे.
नातेसंबंधांची सहा परिमाणे
शिष्य आणि गुरु या दोघांच्या नात्याचे आपण सहा घटक किंवा परिमाणांच्या संदर्भात विश्लेषण करू शकतो. नातेसंबंधात काही समस्या असल्यास, ते कोठे खोटे बोलतात हे ओळखण्यात मदत होऊ शकते जेणेकरून प्रत्येक पक्ष निरोगी संतुलन आणण्यासाठी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू शकेल.
सहा परिमाणे खालीलप्रमाणे आहोत:
- प्रत्येक पक्षांशी आणि नातेसंबंधांच्या धाटणीशी संबंधित तथ्ये
- प्रत्येक पक्षाचे नात्यासंबंधी उद्दिष्ट आणि त्याला परिणामकारक ठरणारे मानसिक घटक
- नात्यात असताना प्रत्येक पक्षाने स्वतःसाठी आणि इतरांसाठी ठरवलेली भूमिका आणि प्रत्येकाच्या एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा व एकमेकांप्रतिच्या भावना
- प्रत्येक पक्षाची नात्यावरील निष्ठा आणि नात्यातील गुंतवणूक आणि त्यावर परिणामकारक ठरणारे मानसिक घटक
- प्रत्येक पक्षाचे इतर मानसिक घटक
- नाते कशा पद्धतीने कार्यरत असते आणि त्याचा प्रत्येक पक्षावरील परिणाम
प्रत्येक पक्षांशी आणि नातेसंबंधांच्या धाटणीशी संबंधित तथ्ये
नात्यावर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येक पक्षाशी संबंधित घटकांमध्ये खालील बाबी अंतर्भूत असतात:
- वय आणि लिंग
- सांस्कृतिक मूळ – आशियाई किंवा पाश्चिमात्य
- संवादाची भाषा किंवा अनुवादकाची गरज- व्यक्तिगत संवाद किंवा शिकवणींसाठी
- मठीय किंवा सामान्य
- धर्म आणि सांसारिक शिक्षणाचे प्रमाण
- भावनिक आणि नैतिक परिपक्वतेच्या दृष्टीने आध्यात्मिक शिक्षक किंवा विद्यार्थी असण्याची पात्रता
- एकमेकांसाठी प्रत्येकाकडे असलेला उपलब्ध वेळ
- इतर विद्यार्थ्यांची संख्या
- निवासी शिक्षक किंवा तात्पुरती भेट देणारे शिक्षक
अशा विशिष्ट धाटणींची शक्यता:
- पाश्चिमात्त्य धर्मकेंद्र – शहरातील मध्यवर्ती केंद्र किंवा निवासी केंद्र
- स्वतंत्र धर्मकेंद्र किंवा मोठ्या धार्मिक संस्थेची उपशाखा
- मठ – आशियामधील किंवा पश्चिमेतील.
प्रत्येक पक्षाचे नात्यासंबंधी उद्दिष्ट आणि त्याला परिणामकारक ठरणारे मानसिक घटक
प्रत्येक नात्यात दोन्ही पक्षांचे नात्यासंबंधीचे उद्दिष्ट जवळपास नेहमीच संमिश्र असते. गुरु शिष्य नाते याला अपवाद नाही.
शिष्य खालील गोष्टींसाठी गुरुकडे येतो:
- माहिती मिळविणे आणि तथ्ये शिकणे
- ध्यानधारणा शिकणे
- व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करणे
- जीवनमान सुधारणे
- भविष्यातील जन्मांमध्ये सुधारणा घडविणे
- अनियंत्रित पूनर्जन्मांपासून(संसारा) मुक्ती मिळविणे
- इतरांनाही आपल्याप्रमाणेच मुक्ती आणि ज्ञानप्राप्ती साध्य व्हावी यासाठी मदतगार ठरता यावे यासाठी ज्ञानप्राप्ती मिळविणे
- चिंतामुक्त होण्यास शिकणे
- समविचारी शिष्यांशी सामाजिक संवाद विकसित करणे
- असामान्य गोष्टी मिळविणे
- एखाद्या शारीरिक आणि भावनिक वेदनेवर जादुई उपाय शोधणे
- एखाद्या मनोरंजक करिष्माई, उदा. ‘धर्म-रसिक’ गुरुकडून ‘धर्म-निश्चिती’ मिळवणे,
कमीअधिक प्रमाणात शिष्याला गुरुंकडून या गोष्टी अपेक्षित असतील:
- बौद्ध मार्गावरील प्रवासासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा
- उपचार
- आध्यात्मिक मार्गदर्शन
- पर्यायी पालकत्व
- मात्यता
- आयुष्यात काय करायला हवे, हे सांगणारं कोणीतरी
उलटपक्षी आध्यात्मिक गुरुच्या अपेक्षा अशा असू शकतात:
- वस्तुस्थिती मांडणे
- मौखिक प्रेषण प्रदान आणि धर्मरक्षण
- शिष्याच्या व्यक्तिमत्त्व विकासावर काम करणे
- शिष्याच्या भविष्यातील आयुष्यांच्या कल्याणासाठी बीजारोपण
- शिष्याच्या चांगला पुनर्जन्म, मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीसाठी साहाय्यक ठरणे
- धर्मकेंद्र किंवा धर्मसंस्था स्थापन करणे
- तिच्या किंवा त्याच्या वंशसुधारणेसाठी मदत
- भारतातील किंवा तिबेटमधील मठांच्या पुनर्निमाणासाठी पैसे जमा करणे
- आश्रयकर्ता म्हणून सुरक्षित आश्रय मिळविणे
- जीवनमान सुधारणे किंवा श्रीमंत होणे
- इतरांवर नियंत्रण मिळवून सत्ता हस्तगत करणे
- लैंगिक लाभ उठविणे
दोन्ही पक्षांना बाधक ठरणारे नकारात्मक घटक:
- एकाकीपण
- कंटाळा
- वेदना
- असुरक्षितता
- ट्रेंडी होण्याची इच्छा
- समुहाचा ताण
नात्यात असताना प्रत्येक पक्षाने स्वतःसाठी आणि इतरांसाठी ठरवलेली भूमिका आणि प्रत्येकाच्या एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा व एकमेकांप्रतिच्या भावना
आध्यात्मिक गुरुच्या शिष्याबाबत असणाऱ्या भावना किंवा शिष्याच्या आध्यात्मिक गुरुबाबत असणाऱ्या भावना:
- बौद्ध धर्माची माहिती देणारा बौद्ध गुरु
- तुमच्या जीवनातील धार्मिक आचरणाचे प्रशिक्षण देणारा धर्म प्रशिक्षक
- ध्यानधारणा किंवा धार्मिक विधींचे प्रशिक्षण
- प्रतिज्ञा देणारा आध्यात्मिक मार्गदर्शक
- तांत्रिक सक्षमीकरणात साहाय्यक ठरणारा तांत्रिक गुरु
शिष्याच्या आध्यात्मिक गुरुबाबत असणाऱ्या भावना किंवा आध्यात्मिक गुरुच्या शिष्याबाबत असणाऱ्या भावना:
- ज्ञान मिळवणारा बौद्ध शिष्ट
- जीवनात धर्म कसा लागू करायचा हे शिकणारा धर्म शिष्य
- ध्यानधारणा आणि धार्मिक विधींचा प्रशिक्षणार्थी
- गुरुंसोबत शपथग्रहण केलेला एक शिष्य
- गुरुकडून वैयक्तिक मार्गदर्शन घेणारा शिष्य
या परिमाणातील आणखी एक घटक म्हणजे नात्यामुळे तिला किंवा त्याला एकमेकांबद्दल नक्की काय वाटते.
शिष्याला वाटू शकते की तो किंवा ती:
- सुरक्षित आहे
- कोणाशी तरी जोडले गेलेले आहे
- संपूर्णत्व
- समाधानी
- नोकर
- पंथाचा सदस्य.
आध्यात्मिक गुरुला वाटू शकते की तो किंवा ती:
- गुरु आहे
- नम्र साधक
- तारणहार
- आध्यात्मिक गुरु
- मानसोपचारतज्ज्ञ
- धर्मकेंद्र किंवा धर्मसंस्थेचा व्यवस्थापक
- मठांचा आर्थिक आधार
प्रत्येक पक्षाची नात्यावरील निष्ठा आणि नात्यातील गुंतवणूक आणि त्यावर परिणामकारक ठरणारे मानसिक घटक
शिष्याशी संबंधित मुद्दे:
- शुल्क भरणारा, दानधर्म करणारा किंवा गुरुला शुल्क किंवा दक्षिणा न देता शिक्षण घेणारा
- बौद्ध धर्म, गुरु किंवा वंशाला सहजतेने पाहणारे किंवा गांभीर्याने वचनबद्ध
- शपथ घेण्याचा इरादा असलेला किंवा गुरुंकडून प्रतिज्ञा घेतलेला किंवा न घेतलेला
- गुरुच्या मदतीची जबाबदारी घेणारा
- ऋणाईत राहणारा
- बांधील वाटणे
- तो किंवा ती एकनिष्ठ असावी अशी भावना बाळगणे- यामध्ये गट दबावाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे
- त्याने किंवा तिने चुकीचे वागल्यास ते नरकात जातील असे वाटणे
आध्यात्मिक गुरुशी संबंधित मुद्दे:
- शिष्यांना नैतिकतेने मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेणारा
- शिष्याच्या जीवनाला दिशा देणारा आणि त्यांना काय करायला हवे हे सांगणारा
- त्याची किंवा तिची कर्तव्ये पार पाडणारा कारण त्यांच्या गुरुंनी त्यांना शिक्षणासाठी धाडलेले असते
- शिष्यांकडे फक्त काम म्हणून पाहणारा
या परिमाणावर प्रभाव टाकणारे नकारात्मक घटक:
- बांधिलकीची भीती
- अत्याचारग्रस्ततेची पार्श्वभूमी असल्याने अधिकारांची भीती
- उपयुक्त ठरण्याची किंवा प्रेम करण्याची गरज
- लक्ष वेधून घेण्याची गरज
- इतरांना नियंत्रित करण्याची गरज
- स्वतःला सिद्ध करण्याची गरज
प्रत्येक पक्षाचे इतर मानसिक घटक
यात अंतर्भूत असलेल्या पक्षांशी संबंधित गोष्टी:
- बहिर्मूख किंवा अंतर्मूख व्यक्तिमत्त्व
- बौद्धिक, भावनिक किंवा समर्पित
- उबदार किंवा थंड
- शांत किंवा तापट
- वेळ आणि लक्ष्य वेधून घेण्यासाठी लोभी
- इतर शिष्य आणि गुरुंविषयी आसूया असणारा
- आत्मसन्मानाचा अभाव आणि अहंकार
नाते कशा पद्धतीने कार्यरत असते आणि त्याचा प्रत्येक पक्षावरील परिणाम
शिष्य आणि गुरुंनी एकत्रित करावयाच्या गोष्टी:
- चांगला किंवा वाईट समूह
- एकमेकांच्या क्षमतांना वाव देणारा गट किंवा एकमेकांच्या क्षमतात अडथळा आणणारा गट
- वेगवेगळ्या अपेक्षांमुळे एकमेकांचा वेळ वाया घालवणारा गट
- श्रेणीबद्ध रचना राखणारा गट, ज्यात शिष्याला लुटल्याची, नियंत्रित केल्याची भावना येऊन कमीपणा वाटतो (आत्मसन्मानाचे खच्चीकरण) आणि गुरु स्वतःला उच्चस्थानावर समजतो- लक्ष्यात घ्या की एकाला काय वाटते याच्याशी दुसऱ्याला काय वाटते याचा संबंध असेलच असे नाही
- असा गट ज्यातील एकट्याला किंवा दोघांनाही प्रेरित किंवा थकल्यासारखे वाटते
सारांश
विद्यार्थी-शिक्षक नातेसंबंधाचे मूल्यमापन आपण सर्व सहा परिमाण आणि त्यातील प्रत्येक घटकाच्या संदर्भात केले पाहिजे. जर घटक एकमेकांशी जुळत नसतील, तर दोन्ही बाजूंनी सामंजस्य दाखवण्याचा आणि जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक फरक किंवा भावनिक कारणांमुळे समस्या सोडवण्याच्या या दृष्टिकोनाला एक बाजू स्वीकारत नसेल, तर दुसऱ्या बाजूने एकतर स्वत:शी जुळवून घेणे किंवा नातेसंबंधांपासून अंतर राखणे आवश्यक आहे.