वैश्विक नीतिमत्तेचं उपयोजन

मानवी मन हे आपल्या सर्व समस्यांचा स्त्रोत आहे आणि योग्य दिशा दिल्यास त्यावरचा उपायही आहे. बरंच शिक्षण घेतलेले, पण सहृदयी नसलेले लोक चिंताग्रस्ततेला, अशांततेला बळी जाण्याचा मोठा धोका असतो. पूर्तता होण्याची शक्यता नसलेल्या अभिलाषांमधून या अशांततेती निष्पत्ती होते. भौतिक ज्ञान सहजपणे नकारात्मक विचारांचा व भावनांचा स्त्रोत होऊ शकतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक मूल्यांचे अस्सल आकलन शांतता निर्माण करते. 
- चौदावे दलाई लामा

मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (एमआयटी) ‘दलाई लामा सेंटर फॉर एथिक्स अँड ट्रान्सफॉर्मेटिव्ह व्हॅल्यूज’मध्ये परम पूजनीय दलाई लामा वैश्विक नीतिमत्तेची गरज स्पष्ट करून सांगत होते, तेव्हा ते म्हणाले की, या पृथ्वीवर सात अब्ज लोकांचा कोणताही विशिष्ट धर्म नाही, त्यामुळे या लोकांना विशिष्ट धर्मावर आधारित मन-प्रशिक्षणाची व्यवस्था देणं आपल्याला शक्य नाही. अशा वेळी प्रशिक्षणाची ही व्यवस्था इहवादी शिक्षणावर आधारलेली असणं अतिशय महत्त्वाचं आहे.

त्या वेळी अमेरिकेत नुकताच वित्तीय संकटाचा स्फोट झाला होता, आणि वॉल स्ट्रीटवरील बहुतांश धुरीण इव्ही लीग विद्यापीठांमधील आहे, असंही दलाई लामा म्हणाले होते. वित्तीय संकटावेळी इतकी उघड झालेली हाव व फसवेपणा त्यांच्या शिक्षणावेळी कशी काय हाताळली गेली नाहीत? आता एमआयटीमधील हे केंद्र हाव, फसवणूक व नकारात्मकता यांवर उपाय कसा करायचा हा प्रश्न हाताळतं. भावनांमुळे आपल्या निर्णयप्रक्रियेला कसा आकार मिळतो आणि आपण घेतलेल्या निर्णयांचे दीर्घकालीन पडसाद कसे उमटतात, हे समजून घेण्याचं काम या केंद्रात केलं जातं.

वैश्विक नीतिमत्तेचं उपयोजन कसं करायचं, याबद्दलही परम पूजनीय दलाई लामा तीन मुद्दे सुचवले:

  • संयमाची नीतिमत्ता
  • गुणाची नीतिमत्ता
  • निःस्वार्थ व करुणा यांची नीतिमत्ता

आपल्या शरीराच्या व वाचेच्या नकारात्मक सवयी कशा सोडायच्या, त्याचा संबंध संयमाच्या नीतिमत्तेशी असतो. शरीर स्थूल रितीने दृश्यमान असतं व मन सूक्ष्म असत, असं परम पूजनीय दलाई लामा म्हणाले. आपल्याला शरीरावरही नियंत्रण ठेवता येत नसेल, तर मनावर नियंत्रण ठेवण्याची आशा कितपत उरेल? त्यामुळे शरीर व वाचा यांच्या नकारात्मक सवयींचं आधी निरीक्षण करून मग मनाचं निरीक्षण करावं, अशा रितीने आपण संयमाची नीतिमत्ता अंमलात आणतो. त्यातून आपल्या गुणाच्या नीतिमत्तेचं उपयोजन करायला वाव मिळतो. करुणा, दयाळूपणा, क्षमाशीलता व विवेकदृष्टी यांसारखं सकारात्मक वर्तन वाढवणं, असा याचा अर्थ होतो. यातून आपण निःस्वार्थ व करुणा यांच्या नीतिमत्तेपाशी येतो. या नीतिमत्तेद्वारे आपली जीवनं दुसऱ्यांना समर्पित केली जातात.

Top