दुसरे त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे यांचा संदेश

अलेक्झ बर्झिन माझे पूर्ववर्ती त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे यांचे दुभाषी आणि निकट अनुयायी होते. आणि आमचे ते धर्मसंबंध या आयुष्यातही विनाव्यत्यय सुरू आहेत. माझ्या पूर्ववर्तींच्या शिकवणीचा अलेक्झ यांनी केलेला अनुवाद आणि स्वतः अलेक्झ यांनी माझ्या पूर्ववर्तींच्या शिकवणीवर आधारित तयार केलेली स्वतःची स्वतंत्र शिकवण बर्झिन अर्काइव्हमध्ये अंतर्भूत आहे. मला अतिशय आनंद आहे की त्यांनी माझ्या पूर्ववर्तींची व्यापक असांप्रदायिक परंपरा कायम ठेवत, ती या संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध भाषांमध्ये व्यापक जनसमुदायासाठी उपलब्ध करून दिली आहे.  

हे काम असेच वृद्धिंगत व्हावे आणि हे संकेतस्थळ पुढील पिढ्यांसाठी वैध माहिती आणि प्रेरणेचा  स्रोत म्हणून कायमस्वरूपी राहावे, हीच माझी गहन प्रार्थना आहे. या माध्यमातून लोकांना मिळणारी अंतर्दृष्टी लवकरच त्यांच्या ज्ञानप्राप्तीच्या रूपात परिपक्व व्हावी, हीच सदिच्छा.

२२ नोव्हेंबर, २००८
त्सेनझाब सरकॉंग तुल्कू

Top