भौतिकतावादाचा सामना कसा कराल

How deal with materialism

भौतिक गोष्टी फक्त शारीरिक समाधान देतात, मानसिक समाधान देत नाहीत. उपभोक्तावादी माणसाचा मेंदू आणि आपला मेंदू एकसारखाच असतो. त्यामुळे आपण दोघेही मानसिक वेदना, एकाकीपण, भीती, शंका आणि असुयेसारख्या भावना अनुभवत असतो. त्या कोणाचेही मन विचलित करू शकतात. पैशाचा वापर करून त्या नाहिशा करणे – अशक्य आहे. काही खूप तणावात असलेली माणसे औषधांची मदत घेतात. त्यातून तणाव तात्पुरता कमी होतो, पण इतर दुष्परिणाम होतात. तुम्ही मनःशांती खरेदी करू शकत नाही. ती कुणीही विकत नाही, पण प्रत्येकाला ती हवी असते. खूप लोक त्यासाठी प्रशांतक औषधं घेतात, पण तणावग्रस्त मनासाठी करुणा हेच खरे औषध आहे. त्यामुळे उपभोक्तावादी माणसांसाठी करुणा गरजेची आहे.   

मनःशांती हे उत्तम आरोग्यासाठीचे औषध आहे. ते शारीरिक घटकांमध्येही संतुलन कायम ठेवते. हेच चांगल्या झोपेबाबतही खरे आहे. जर आपण शांत चित्ताने झोप घेतली, तर तिथे अजिबात तणाव अनुभवाला येत नाही आणि झोपेच्या गोळ्यांचीही गरज पडत नाही. कितीतरी लोक चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण तुम्ही त्रासलेले असाल, तर चेहऱ्यावर कितीही रंग फासला तरी फायदा होणार नाही. तुम्ही कुरूपचं दिसाल. पण तुमच्या चेहऱ्यावर रागाच्या जागी हास्य असेल तर तुमचा चेहरा आकर्षक दिसेल आणि तुम्ही अधिक चांगले दिसाल.

जेव्हा आपण करुणाभाव विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतो, तेव्हा राग आला तरी तो काही काळच टिकतो. हे तीव्र प्रतिकारशक्ती असण्यासारखे आहे. प्रतिकारशक्ती चांगली असली की विषाणू संक्रमन झाले तरी फार त्रासदायक ठरत नाही. त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक आणि करुणादायी दृष्टिकोनाची गरज आहे. शिवाय प्रत्येकातील परस्परसंबंधांचे विश्लेषण करून त्याच्याशी परिचित झाल्यास आपल्याला अधिक सामर्थ्य मिळेल.

आपल्या सर्वांमध्ये चांगुलपणाच्या समान क्षमता असतात. तेव्हा स्वतःचे निरीक्षण करा. स्वतःतल्या सकारात्मक क्षमता ओळखा. तुमच्यात कदाचित नकारात्मकताही असेल, पण चांगल्या गोष्टींसाठी आवश्यक क्षमताही तुमच्यात असतात. माणसाचा मूलभूत स्वभाव सकारात्मक आहे. आपले जीवन करुणेपासूनच सुरू होते. त्यामुळे क्रोधाच्या बिजापेक्षा करुणेचे बी सामर्थ्यशाली असते. त्यामुळे स्वतःकडे अधिक सकारात्मकतेने पाहा. त्यातून अधिक स्थिरचित्त लाभेल. त्यामुळे समस्या उद्भवल्यास, त्यांचा सामना करणे अधिक सोपे होईल.

महान बौद्धगुरू शांतिदेव यांनी लिहिले आहे की, जेव्हा समस्या येतात, तेव्हा त्यांचे विश्लेषण करून त्या टाळता आल्यास चिंता करण्याचे कारण नसते. आणि त्या टाळणे शक्य नसल्यास चिंता करून फायदा नसतो. त्यामुळे वास्तवाचा स्वीकार करायला हवा.

Top