शिक्षक आणि अनुवादक काहीवेळा चुका करतात

अनुवादक अनेकदा चुका करतात. तुम्ही जे काही बोलले गेले आहे, लिहिलेले आहे किंवा तुमच्या रेकॉर्डरवर आंधळेपणाने विसंबून राहू नये. ते मूर्खपणाचे आहे. त्याचप्रमाणे, मी शिकवत असताना, माझी जीभ घसरू शकते किंवा काही वेळा चुकीचे बोलू शकतो. अशा वेळी, तुम्ही तुमच्या रेकॉर्डरवर नंतर जे ऐकता त्यावर आंधळा विश्वास ठेवू नये. बुद्धाने स्वतःच्या शिकवणीच्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे, एखादी गोष्ट मी म्हटली म्हणून स्वीकारू नका, तर कोणीतरी सोन्याची चाचणी घेत असल्यासारखे त्याचे विश्लेषण केले पाहिजे. विश्वासावर विसंबून राहू नका किंवा रेकॉर्डरवर असलेल्या सर्व गोष्टी अक्षरशः घेऊ नका.

जोपर्यंत तुम्ही नववी बोधिसत्व भूमी पातळी गाठत नाही तोपर्यंत तुम्ही चुका करत राहता. मनाची ही नववी पातळी गाठल्यानंतरच तुम्ही गोष्टी समजावून सांगताना चुका करणे थांबवता. त्या वेळी तुम्हाला चार अचूक आणि संपूर्ण समजुती प्राप्त होतात. एकदा का तुम्ही ते प्रत्यक्षात आणले की मग तुम्ही त्यापुढे कोणतीही चूक करत नाही.

उदाहरणार्थ, बोधिसत्व व्यवहाराचा अंगीकार, अर्थात  बोधिचार्यावतार या विषयावरील शिकवणीच्या प्रारंभीच मला याचे भाषांतर कसे झाले आहे माहीत नाही. पण मी जे सांगत होतो ते असे होते की,  कुनु लामा रिंपोछे यांनी बोधगयामध्ये बुद्धपालिताची संस्कृत हस्तलिखिते वाचण्यासाठी दोन वर्षे व्यतीत केली तेव्हा त्याचे तिबेटी भाषांतर उपलब्ध नव्हते. हे सांगताना माझी जीभ घसरली होती. मला असे म्हणायचे होते की ते विशिष्ट हस्तलिखित, ती विशिष्ट आवृत्ती तिबेटीमध्ये अनुवादित केलेली नव्हती. बुद्धपालित ग्रंथाचे तिबेटी भाषेत भाषांतर झालेले नाही हे सर्वसाधारण विधान बरोबर नाही. तुम्हाला आठवत असेल की मी म्हणालो की जे त्सोंगखापा यांनी त्या मजकुराचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांना दृष्टीकोन लाभला. तुम्ही माझे बोलणे तपासायला हवे आणि प्रश्न विचारायला हवे होते, कारण अशाच रीतीने या गोष्टी घडतात. कधी कधी अशा चुका होतात.

उदाहरणार्थ, त्या दिवशी प्रथमच जेव्हा मी प्रासंगिका आणि चित्तमात्रा प्रणाली सादर केल्या तेव्हा मी बरोबर सांगितले होते की सौत्रांतिका प्रणालीत तुमच्याकडे सखोल सत्य घटनेसाठी तीन समानार्थी शब्दांचा संच आहे: सशर्त घटना, वस्तुनिष्ठ घटक आणि अस्थिर घटना. मी असेही म्हटले आहे की तुमच्याकडे पारंपरिक सत्य घटनेसाठी समानार्थी शब्दांचा आणखी एक संच आहे: बिनशर्त घटना, आधिभौतिक घटक आणि स्थिर घटना. मी पुढे म्हणालो की चित्तमात्रा प्रणालीत तुमच्याकडे इतर-सक्षम, पूर्णपणे स्थापित आणि पूर्णपणे काल्पनिक घटनांचे सादरीकरण आहे. त्या प्रणालीमध्ये, पूर्णपणे काल्पनिक घटना खरोखर स्थापित, निर्विवाद अस्तित्व नसलेल्या आहेत. काल, जेव्हा मी मजकुराचे पुनरावलोकन केले, जरी ते तसे भाषांतरित केले गेले नसले तरी - अनुवादकाने ते स्वतः दुरुस्त केले होते - मी स्वतःला दुरुस्त केले कारण मी दोन प्रकारच्या खर्‍या घटनेसाठी समानार्थी शब्दांच्या संचाचा सौत्रांतिका प्रणालीनुसार उलटा वापर केला होता. अशा प्रकारे, जीभ घसरून अनर्थ होऊ शकतो.

तुम्ही जे पाहता, ऐकता, वाचता आणि करता ते सर्व तुम्ही नेहमी तपासून पाहिले पाहिजे. एक शिक्षक म्हणूनही, शिकवल्यानंतर, मी नक्की काय बोललो याचे पुनरावलोकन करतो आणि माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत का ते तपासतो. त्याचप्रमाणे शिकवण ऐकणाऱ्यांनीही असेच करायला हवे.  

Top