नव्या धार्मिक युद्धांविरोधात नव्या उपायांची गरज

धार्मिक राष्ट्रवादाच्या नव्या विचारसारणीतून बळावलेली नवी धार्मिक युद्धं जगभरातील नागरिकांचं शांततापूर्ण सहअस्तित्व नष्ट करत आहेत. 

हा विचारसारणीचा नवा विषाणू अरबी समाजवाद्यांविरूद्धची तटबंदी म्हणून मध्यपूर्वेतील मुस्लिम सत्ता आणि राजशाहीने आपलासा करण्यापूर्वी ख्रिस्ती मूलतत्त्ववादाच्या रूपाने १९२० मध्ये उद्याला आला. भारतातील खलिस्तान चळवळीमुळे या मूलतत्त्ववादाला अधिक चालना मिळाली आणि इराण व पाकिस्तानातील इस्लामी राजवटींना राजकीय यश प्राप्त झालं. आता, या धार्मिक मूलतत्त्ववादाने पुन्हा मलेशिया, श्रीलंका, भारत, म्यानमार, नायजेरिया, पाकिस्तान, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आणि कितीतरी देशात पाहायला मिळणाऱ्या परदेशी नागरिकांबद्दल द्वेषभाव बाळगणाऱ्या धार्मिक राष्ट्रवादाचं नवं रूप धारण केलं आहे. 

प्रोटेस्टंट सुधारणांनंतरच्या १५२४-१६४८ दरम्यानच्या ख्रिस्ती युरोपीय धार्मिक युद्धांपेक्षा ही धार्मिक राष्ट्रवादी युद्धं भिन्न आहेत. या लढाया १६४८च्या वेस्टफेलिया शांतताकरारासह आणि धर्माला राजकारणापासून वेगळं करणाऱ्या धर्मनिरपेक्षतावादासह संपल्या, हा धर्मनिरपेक्षतावाद राष्ट्र-राज्यांसाठी जागतिक मॉडेल व्हावा, यासाठी वसाहतवादाच्या माध्यमातून पसरविण्यात आला.  

दरम्यान, सध्याच्या धार्मिक युद्धांची मूळे धार्मिक निकषावरील परदेशी नागरिकांबाबतचा द्वेषभाव आणि पौराणिक श्रेष्ठता यात रूजलेली आहेत. हा नवा आजार, सहअस्तित्व, सहिष्णुता आणि जपान ते भूमध्य परिसरात प्राचीन सिल्क रूटमार्गे होणाऱ्या व्यवसायासाठी पूरक असलेल्या वसाहतवादपूर्व धार्मिक दृष्टिकोनात आढळत नाही. 

जनक्षेत्रातील धर्मांमधून धर्मनिरपेक्षतेला हद्दपार केलं जाण्यात या नव्या धार्मिक युद्धांची मुळं आहेत. धर्मनिरपेक्षतेत धर्मांचं अस्तित्व नष्ट होण्याची आशा व्यक्त केली गेली होती, पण ही दडपशाही वांशिक बहुसंख्यांकाच्या राजकीय अजेंड्यात परिवर्तित होण्यास कारणीभूत ठरली. 

त्यामुळे धर्म हे सर्व युद्धांचे कारण असल्याचा लोकप्रिय सिद्धांत हा ऐतिहासिक भूल असल्याचे भूतकाळातील हजारो शांततामय आंतरधर्मीय समन्वयांनी दाखवून दिले आहे. तरीही आधुनिक युगात, अल्पसंख्याकांची लोकसंख्या वेगानं वाढून बहुसंख्याकांना वरचढ ठरेल, या कपोलकल्पित भीतीने अल्पसंख्यांक नागरिकांना घाबरवण्यासाठी धर्मांचा वापर केला जात आहे. अशी भीती शास्त्रीय दृष्ट्या गैर असून लोकसांख्यिकीयदृष्ट्या अविश्वसनीय आहे. 

१९४५ नंतरच्या इतिहासानं राष्ट्रउभारणीतून जन्मास आलेल्या काश्मीर, पॅलेस्टीन, उत्तर आयर्लंड, कुर्दिस्तान, दक्षिण थायलंड आणि दक्षिण फिलिपाईन्स मधील राष्ट्रीय वादांची लाट अनुभवली. प्रत्येक प्रकरणात विद्रोहींना धर्माधारित राज्यांची अपेक्षा नव्हती. उलट हे आधुनिक युगातील निराकरण न झालेले राजकीय अवशेष आहेत, आणि त्यामुळे त्यांवर राजकीय उपायांचीच गरज आहे.   

शीतयुद्धानंतरच्या धार्मिक राष्ट्रवादाने धोरणकर्त्यांसमोर अशी अकल्पित डोकेदुखी निर्माण केली आहे, ज्याला पाठ्यपुस्तकीय उत्तरे उपलब्ध नाहीत. धर्मवादी अजेंडा असणाऱ्या राष्ट्रवादी गटांकडून त्यांचं नेतृत्व केलं जात आहे, ज्या गटांनी इस्राईल, पाकिस्तान, भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये सत्तेच्या परिघात प्रवेश केला आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहातील धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद धर्मवादात परिवर्तित झाला आहे. आधुनिक सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण राष्ट्रांचा पाया असणाऱ्या जागतिक नागरिकत्वाची संकल्पना, तिचा वापर आणि त्याप्रतिचा आदर उध्वस्त होण्यापासून आपण रोखू इच्छित असू, तर या नव्या संकरित पायंड्याचे विश्लेषण करण्याची आणि तो समजून घेण्याची गरज आहे.

धार्मिक राष्ट्रवादी चळवळींचा उदय आणि प्रचंड व्यावसायिक भौतिकवादाच्या परिणामांनी कमी लेखल्या गेलेल्या कॉस्मोपॉलिटिन आशियाच्या भविष्यापेक्षा हे देखील कमी धोकादायक नाही. या आव्हानाचे निराकरण करण्यासाठी कोणताही सामाजिक सिद्धांतवादी किंवा धर्मपालक सुसज्ज नाही. इथे खरी आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाची गरज आहे. 

सध्याचे धोरण धार्मिक राष्ट्रवादाचा उदय आणि हिंसाचाराला सुरक्षेच्या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून हाताळते. हे पुरेसे नाही आणि वेदनेवरचे उपाय हे तिच्या कारणमिमांसेत दडलेले असतात, या बौद्ध शिकवणीला दुलर्क्षित करणारे आहे. 

आग्नेय आशिया भूराजनीतिक महासत्तांच्या कचाट्यात सापडला आहेच, पण शिवाय एकमेकांविरोधात उभं राहायला लावणाऱ्या हिंसक धार्मिक राष्ट्रवादाने संक्रमित झालेल्या ख्रिश्चन, मुस्लिम आणि बौद्ध लोकसंख्येच्याही कचाट्यात सापडला आहे. प्रशिक्षित कुशल मानवी संसाधनं आणि दर्जेदार साधनसुविधांमुळे वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक आर्थिक केंद्रांच्या भविष्यासाठीही हे धोकादायक आहे. आसियान समुहातील देश शीतयुद्धापासून बचावले, त्यांना अंतर्गत धार्मिक राष्ट्रवादात स्वतःला उध्वस्त करून घेणं परवडणारं नाही. 

धार्मिक राष्ट्रवाद नागरिकत्वासाठी मोठा धोका आहे, आणि हे हिंसक भविष्य टाळायचे असल्यास राज्यांना शिक्षणप्रणालीच्या माध्यमातून त्याचा सामना करावा लागेल. सध्याचं तंत्रज्ञान-केंद्रित शिक्षण आणि सोशल मीडियाकडून घडवल्या गेलेल्या दैनंदिन जीवनात, वांशिक भूषणत्व आणि भयगंडासारख्या विषयांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सखोल जाणिवेचा अभाव आहे. वाढता विडंबनवाद, आंतरजातीय अज्ञान, असहिष्णूता आणि परिणामस्वरूप होणारी हिंसा यांचा प्रतिपादक म्हणून अभ्यासक्रमात सुधारणा करून मानवतावादी अभ्यासाच्या समावेशाची गरज आहे. आपल्या पूर्वजांनी मोठा त्याग केला आहे आणि आत्ताच्या पिढीला शांततापूर्ण जगता यावं, यासाठी स्वातंत्र्य व विकासाच्या कारणांसाठी प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. आपण आपल्या मुलांसाठी हिंसेनं भरलेल्या भविष्याचा वारसा ठेवून जाता कामा नये.      

यावर उपाय काय आहे?  धर्मनिरपेक्षतावाद्यांनी सार्वजनिक क्षेत्रात धर्म सामावून घ्यायला हवा आणि धार्मिक नेत्यांनी धर्माची सार्वजनिक भूमिका आणि आध्यात्मिकता यांच्यातील संतुलन कायम ठेवण्यासाठी साहाय्य करायला हवे. दरम्यान सर्व धार्मिक नेत्यांनी त्यांच्याच सदस्यांकडून होणाऱ्या हिंसात्मक कृतींचा निषेध करावा. स्वतःचे हितसंबंध असलेल्या गटांपेक्षा नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण ही राष्ट्रीय प्राथमिकता असायला हवी. 

जागतिकीकरण वैविध्य, लोकशाही आणि प्रत्येक मानवाच्या मुलभूत गरजांच्या संरक्षणाचा आदर ठेवण्याची मागणी करतं. नवी धार्मिक राष्ट्रवादी युद्धं आपण धर्मनिरपेक्षतावादानंतरच्या युगात प्रवेश करत असल्याच्या धोकादायक संकेत आहे. याची मुळं धर्मात नाहीत, तर धर्मनिरपेक्ष जगाच्या धर्मावर होणाऱ्या परिणामात आहेत. जुन्या युरोपीयन धर्मयुद्धांमुळे धर्मनिरपेक्षता, विकास आणि मूलतत्त्वे घडली. धर्मनिरपेक्षतावादी आणि धार्मिक मूलतत्त्ववादी आपापला मार्ग चालवित आहेत. आता तातडीनं सार्वभौम जगासाठी - जे केवळ व्यावसायिक उपक्रम किंवा दहशतवादाविरोधातलं प्रतिक्रियात्मक संरक्षण नसून स्वातंत्र्य, करुणा, न्याय आणि कारण टिकवून ठेवणारी समावेशक सभ्यता असेल - अशा जगासाठी नवा मानवतावाद शोधण्याचं काम हाती घेणं गरजेचं आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांनी हा दृष्टिकोन समर्पकपणे मांडला आहे:

जिथे ज्ञान मुक्त आहे, जिथे जग अरूंद घरगुती भिंतींनी विभागलेले नाही, जिथे शब्द सखोल सत्यातून उगवतात, जिथे अथक प्रयत्न परिपूर्णतेला कवेत घेतात, जिथे तर्कशक्तीचा स्पष्ट प्रवाह मृत सवयींच्या वाळवंटात हरवलेला नाही, जिथे मन व्यापक विचारांनी आणि कृतींनी व्यापले आहे - त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात, माझ्या देशाला जाग यावी, माझ्या पित्या.    
Top