आपण कोणत्याही परिस्थितीत असू, आपणा सर्वांनाच सुख अनुभवायचे असते. पण जो जीवनातील प्रत्येक परिस्थितीला सक्षमपणे सामोरा जाऊ शकतो, असा सुखी व्यक्ती कसे व्हायचे? यासाठी इथे काही बौद्ध टिपा दिल्या आहेतः
- प्रत्येक दिवशी काही काळ शांततापूर्ण अस्वथेत व्यतीत करा- श्वासांवर नियंत्रण मिळवून चित्त शांत करण्याचा प्रयत्न करा.
- इतरांसोबत असाल, तेव्हा आपल्या वागण्या-बोलण्याबद्दल सजग असा; आणि एकटे असाल तेव्हा स्वतःच्या मनातील भावनांबद्दल सजग असा- विधायक आचार-विचारावर भर द्या.
- प्रत्येक दिवशी कुणासाठी काहीतरी चांगले कार्य करा – त्यांच्या भल्याची प्रामाणिकपणे काळजी घ्या.
- इतरांशी स्नेहपूर्वक वागा – त्यातून तुमचा आत्मसन्मान वाढेल.
- स्वतःसोबतच इतरांच्या सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करा- समस्या उद्भवल्यास उपयुक्त सूचना करा.
- इतरांकडून घडलेल्या चुकांना विसरून जा – इतरांना माफ करण्याचा सराव करा.
- स्वतःच्या चुकाही विसरा – स्वतःलाही माफ करायला शिका.
- वास्तव स्वीकारा – जीवन चढ-उतारांनी भरलेले असते, पण परिस्थिती कशीही असली, तरी काळ पुढे सरकत राहतो.
सुखी असण्याची भावना आपोआप निर्माण होत नाही, तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, प्रत्येक जण सुखी जीवन जगू शकतो.