जीवनासाठी उपयुक्त बौद्ध टिपा

How to tips for life ridwan meah unsplash

काही वेळा आपल्याला आयुष्यात हरल्यासारखे वाटते. आयुष्यातील आव्हानांचा सामना करून सकारात्मक उद्दिष्टे कशी साध्य करायची, याची आपल्याला कल्पनाच नसते. इतरांसोबत आपले संबंध कसे सुधारायचे, हेही आपल्याला कळेनासे होते. पण पारंपरिक बौद्ध शिकवणीत कोणत्याही संस्कृतीतील कोणत्याही व्यक्तीसाठी आणि कोणत्याही वेळेसाठी लागू होतील, अशा उपयुक्त मार्गदर्शक तत्त्वांचा खजिना आहे.

इतरांच्या मदतीसाठी आवश्यक असणारे गुण

  • उदारता – आपला वेळ, सल्ला, मदत आणि संपत्तीच्या दृष्टिकोनातून
  • स्वयंशिस्त – वागण्या-बोलण्याचे विघातक मार्ग टाळणे, आणि शक्य त्या मार्गाने इतरांना मदत करण्याच्या उद्देशाने
  • संयम – इतरांना मदत करताना येणाऱ्या समस्यांमुळे क्रोधित किंवा वैतागून जाऊ नये यासाठी
  • साहस आणि सहनशक्ती – परिस्थिती कितीही कठीण असो, न थांबता मदत काम करत राहण्यासाठी
  • मानसिक आणि भावनिक स्थैर्य – विचलित न होता आपण एकाग्र राहण्यासाठी
  • फरक ओळखण्याची समज – काय विधायक आहे आणि काय विघातक आहे, काय योग्य, काय अयोग्य ओळखण्याची समज

इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठीचे मार्ग

  • उदार व्हा – तुमची वेळ, रस आणि ऊर्जा या बाबतीत
  • प्रेमळपणे बोला – तुम्ही काय बोलता, यासोबतच कसे बोलत आहात, याचाही लोकांवर परिणाम होतो, याबाबत कायम सजग राहा
  • वर्तन आणि वाणी अर्थपूर्ण असू द्या – इतरांना त्यांची विधायक कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहित करा
  • आदर्श घालून द्या – तुम्ही जो सल्ला देता, तसेच वागण्याची सवय बाळगून आदर्श निर्माण करा

आपली सकारात्मक उद्दिष्टे कशी साध्य कराल

  • आपल्या उद्दिष्टांबद्दल स्पष्टता असू द्या – तुमची उद्दिष्टे वास्तववादी असल्याची खात्री करून घ्या आणि ती पूर्ण करण्याच्या तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा
  • स्वयंशिस्त बाळगा – उद्दिष्टाबाबत एकाग्र राहण्यासाठी आणि उद्दिष्टापासून भरकटून इतर गोष्टींकडे आकर्षित होऊ नये यासाठीची स्वयंशिस्त
  • उदारपणा – तुमची वेळ आणि उद्दिष्यपूर्तीसाठी आवश्यक प्रयत्नांबद्दल उदारपणा बाळगा.
  • मन मोकळे ठेवा – उद्दिष्टपूर्तीसाठी साहाय्यक गोष्टी शिकण्यासाठी मन मोकळे ठेवा.
  • आत्मसन्मानाची जाणीव असू द्या – उद्दिष्टपूर्तीत अडथळा निर्माण करतील अशा निंदनीय गोष्टी तुमच्याकडून घडू नयेत, यासाठी आत्मसन्मानाची जाणीव असू द्या.
  • काळजी घ्या – तुमची बेजबाबदार वर्तणूक तुमच्या टीमवर नकारात्मक परिणाम करणार नाही, याची काळजी घ्या.
  • सजगपणे फरक ओळखा – कोणती गोष्ट उपयुक्त ठरेल आणि कोणती गोष्ट तुमच्या प्रगतीत अडसर ठरेल, यातील फरक ओळखा.

तुमच्या सकारात्मक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आवश्यक गुणांची मशागत

  • संतोषाची भावना – अवास्तव गोष्टींसाठी लोभी न होता वास्तववादी उद्दिष्टांच्या  प्राप्तीसाठीची भावना
  • इतरांप्रति निराशा, क्रोध किंवा द्वेषाची भावना न बाळगणे – विशेषतः जेव्हा एखादी गोष्ट अपरिहार्यपणे बिघडते.
  • आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे – आणि त्या उद्दिष्टप्राप्तीतून मिळणाऱ्या फायद्यांवर लक्ष केंद्रित करणे
  • आपले चित्त नियंत्रित करणे – शांत राहण्याच्या आणि कोणत्याही परिस्थितीत मानसिक संतुलन कायम ठेवण्याच्या दृष्टीने चित्त नियंत्रण
  • सर्व गोष्टी परिवर्तनशील असल्याचे कायम स्मरणात ठेवणे – तुमची मनःस्थिती काहीही असो,  तुमची मानसिक आणि भावनिक स्थिती स्थिर किंवा कायमस्वरूपी नसते, ती सुधारता येऊ शकते.
  • मनःशांती कायम ठेवणे – तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात, या जाणिवेसह मनःशांती कायम ठेवणे

स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचे मार्ग

  • स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येऊ नयेत, अशी स्थिती निर्माण होऊ देऊ नये – परिणामी तुमच्या तत्त्वांना मुरड घालून पश्चाताप करावा लागेल अशी स्थिती टाळणे
  • लैंगिक संबंधांमध्ये विश्वासघात करू नये – यामुळे निश्चित गुंतागुंतीची आणि समस्याजनक परिस्थिती उद्भवू शकते.
  • सर्वोच्च जबाबदारीच्या उच्च पदांचा मोह ठेवू नये – ते तुमचा वेळ आणि ऊर्जा संपवून टाकेल.
  • तुमच्या सकारात्मक सवयी बदलायला लावतील, अशा लोकांचा प्रभाव टाळावा – जसे सकस आहाराचे सेवन, धूम्रपान न करणे आणि व्यायाम करणे – अशा सवयी बदलल्यास ते आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी घातक ठरू शकते.
  • तुम्हाला शक्य होणार नाहीत, अशी कामे करण्याचे वचन देऊ नये – त्यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल.
  • अविचारी पद्धतीने कोणतेही काम करू नये – त्यातून केवळ नकारात्मक परिस्थिती उद्भवते.

आव्हानात्मक स्थितीत बचावात्मक ठरणारे गुण

  • उत्तेजित होऊ नये – विशेषतः कौतुक किंवा टीका स्वीकारताना
  • एखाद्याप्रति आपण भावनिक स्तरावर अवलंबून नाही ना किंवा एखाद्यासोबत शत्रुत्वाचा व्यवहार करू नये, याबाबत सजग असणे – जेव्हा तुम्ही एखाद्या जवळच्या किंवा नावडत्या व्यक्तीला भेटता
  • तुमच्या आदर्श तत्त्वांना विरोधाभासी ठरेल, अशा मार्गाने वागू नये – तुमच्या दैनंदिन कामात असताना
  • भौतिक गोष्टींबाबत आसक्ती बाळगू नये – जेव्हा तुमच्याकडे अमाप संपत्ती असते, तेव्हा उच्च ध्येयांचा विसर पडू नये.
  • स्वतःची कीव करू नये – विशेषतः आजारी किंवा त्रासात असताना, उलट या परिस्थितीचा वापर आत्मशक्ती वाढवण्यासाठी करावा.
  • तुमच्या कमतरतांवर मात करून तुमच्यातील सर्वोच्च सकारात्मक क्षमतांची जाणीव वाढवणे – सदासर्वकाळ.
Top