बौद्ध साधना म्हणजे काय?

What%20is%20buddhist%20practice

बौद्ध धर्माचा मुख्य भर आपल्या कमतरतांवर मात आणि सकारात्मक क्षमतांचा विकास करण्यावर आहे. स्पष्टतेचा अभाव आणि भावनिक असमतोलासारख्या कमतरता आपल्या आयुष्यात गोंधळाची स्थिती निर्माण करतात. परिणामी, आपण क्रोध, लोभ आणि अज्ञानासारख्या त्रासदायक भावनांच्या आहारी जाऊन व्यवहार करतो. तर सकारात्मक क्षमतांमध्ये संवादाच्या क्षमता, वास्तवाची जाणीव, इतरांप्रति सह-अनुभूतीची भावना आणि स्वतःत सुधारणा घडवण्याची क्षमता, आदी क्षमतांचा समावेश होतो. 

बौद्ध साधनेची सुरुवात चित्त स्थिर करण्यापासून आणि सचेतनता विकसित करण्यापासून होते. याचा अर्थ आपली कृती, इतरांसोबतचा व्यवहार आणि एकांतात असतानाची आपली विचार पद्धती यांची सातत्याने जाणीव ठेवत सजग राहणे. याचा अर्थ फक्त त्यांचे निरीक्षण करून त्यांना आहे त्या अवस्थेत ठेवणे, असा होत नाही. जेव्हा आपण सचेतन असतो, तेव्हा आपण विधायक आणि विघातक गोष्टींमधील फरक ओळखू शकतो. हे अर्थात स्वतःत हरवून जाणे नाहीः तर आपण इतरांची अधिक काळजी घेऊ लागतो आणि अधिक मनमोकळे होते.

या आत्मपरीक्षण आणि स्व-जाणिवेचा उद्देश आपल्या समस्यांची कारणे शोधणे हा आहे. बाह्य घटक आणि लोक अर्थात संकटाची स्थिती निर्माण करतात- पण बौद्ध दृष्टिकोन सखोल कारणमीमांसेवर भर देतो आणि त्यासाठी आपल्याला मनाच्या निरीक्षणाची गरज असते [पाहाः मन म्हणजे काय?]. आपल्या मानसिक सवयी आणि सकारात्मक व नकारात्मक भावना आपल्या आयुष्यातील अनुभवांवर परिणाम करत असतात.

जेव्हा आपण आपल्या कामामुळे तणाव, निराशा, चिंता, एकाकीपण आणि असुरक्षितता अनुभवतो, तेव्हा आपल्याला मानसिक आणि भावनिक स्तरातून त्यांच्याशी लढण्याची क्षमता मिळते. त्या समस्येतून मिळत नाही [पाहाः चिंतेचा सामना कसा करावा]. जीवनातल्या निरंतर प्रश्नांचा सामना करण्याचा योग्य मार्ग म्हणजे आपले चित्त स्थिर करून मानसिक समतोल आणि स्पष्टता विकसित करणे.

एकदा का आपण दुःख आणि कठीण परिस्थिती उत्पन्न करणाऱ्या भावना, दृष्टिकोन आणि व्यवहारांप्रति सजग झालो तर आपण त्यावर उपचार करू शकतो.

वास्तवाचे पारदर्शी ज्ञान आणि मनावर काम करून त्या आधारे आपण मानसिक आरोग्य प्राप्त करणे आवश्यक आहे. - चौदावे दलाई लामा

आपण सर्व जण शारीरिक आरोग्याच्या काळजीवर भर देतो, पण मानसिक आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. मानसिक आरोग्यासाठी आपल्याला तीन गोष्टींप्रति सचेतन असणे आवश्यक आहेः आपल्या तणावग्रस्त मनाला शांत करणाऱ्या भावनांची आपल्याला जाणीव असायला हवी, त्यांचा वापर करण्याची आठवण ठेवायला हवी आणि गरज पडेल तेव्हा त्यांचा वापर करण्याचे लक्षात ठेवायला हवे आणि सातत्याने त्याचा वापर करण्याची आठवणही ठेवायला हवी.

मनाची तणावग्रस्तता कमी करणाऱ्या भावना लक्षात ठेवण्यासाठी आपण खालील गोष्टी करायला हव्याः

  • त्या कोण-कोणत्या भावना आहेत, ते समजून घ्यायला हवे.
  • त्या भावनांना नेमकेपणाने जाणून घेईपर्यंत, त्यांचा वापर समजून घेईपर्यंत आणि त्यांच्या वापराबाबत आपण आश्वस्त होईपर्यंत त्यांचे वारंवार चिंतन करायला हवे.
  • त्यांच्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी त्यांचा दैनंदिन ध्यानधारणेत वापर करावा.

आपण स्वतःच स्वतःचा वैद्य होण्याची गरज आहेः आपल्या मनोविकारांची चिकित्सा करायला शिकायला हवे, त्याची कारणे समजून घ्यायला हवी, उपलब्ध उपचार शोधायला हवेत आणि त्यांचा वापर करण्याच्या पद्धती शिकायला हव्यात आणि त्या पद्धतींचा योग्य वापरही शिकायला हवा.

जेव्हा आपण दीर्घकाळ आजारी असतो, तेव्हा आपल्या जीवनशैलीत बदल करण्यापूर्वी त्या बदलांमुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल स्वतःला आश्वस्त करायला हवे. बहुतांशी लोक पोषण आणि आरोग्याच्या सखोल अभ्यास आणि प्रशिक्षणाशिवाय सुरुवातीलाच आहाराच्या सवयी आणि व्यायामावर भर देतात. अर्थात सुरुवात करण्यापूर्वी सल्ला आवश्यक असतो. पण जेव्हा ते उपकारक परिणाम अनुभवतात, तेव्हा ते अधिक प्रेरित होऊ शकतात.

आपल्या मानसिक आरोग्यासाठीही हीच पद्धत अवलंबली जाते. एकदा का आपल्या सचेतन अवस्थेमुळे आपण सुखाची चव अनुभवली की, आपले जीवन सुधारण्यासाठी आणि इतरांचे भले करण्यास सक्षम होण्यासाठी साहाय्यक ठरणाऱ्या बौद्ध साधनेच्या शिकवणीत रस निर्माण होतो आणि प्रेरणा विकसित करणे सोपे होते.

एकेकाळी बुद्धसुद्धा जीवनातल्या समस्यांशी झुंजणारा आपल्यासारखा सामान्य माणूसच होता. आणि आपल्यासारखेच त्यांनाही त्यांचे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे जीवन सुधारायचे होते. त्यांच्या आत्मपरीक्षणातून त्यांना भोवतालाच्या वस्तुस्थितीची आणि आपल्यातील चित्त स्थिर ठेवणाऱ्या क्षमतांची आणि भावनांवरील नियंत्रणाची जाणीव झाली.

हा गुण- ज्याला दलाई लामा भावनिक आरोग्य म्हणतात - एक असा गुण आहे जो संस्कृती आणि धर्माच्या सीमांच्या पल्याडचा आहे कारण तो आपल्या सर्वांना अपेक्षित असलेल्या सुख, शांतता आणि तणावमुक्तीच्या गाभ्याला स्पर्श करतो.


Top