ध्यानधारणेच्या आरंभापूर्वीची तयारी
ध्यानधारणेसाठी उपयुक्त ठरणारे वातावरण ध्यानधारणा करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल अशी परिस्थिती खरोखर आवश्यक असते. ध्यानधारणेसाठी साह्यभूत ठरतात असे अनेक घटक असतात. परंतु त्यांची चर्चा अथवा सादरीकरण हे एकांतवासातील ध्यानधारणेच्या संदर्भात प्रामुख्याने केली जाते. वस्तुत:...