ध्यानधारणेसाठी आवश्यक मानसिक घटक
विवेकी ध्यानधारणा
सर्वसाधारणपणे ध्यानधारणेत दोन पातळ्या असतातः विवेकी ध्यानधारणा आणि स्थिरतादायी ध्यानधारणा. विवेकी ध्यानधारणेत आपण प्रागतिक पातळ्यांवर किंवा तर्काच्या आधारावर काम करतो. जसे चिंतन प्रक्रियेत आपण एक विशिष्ट चित्तवृत्ती विकसित करायचा प्रयत्न करतो, जिच्याशी आपण...