ध्येय – तिबेटी बौद्ध परंपरेमध्ये ध्यानधारणा म्हणजे काय याचा शोध घ्या; ती कशी करायची हे शिकून घ्या; आणि प्रशिक्षणातून मार्गदर्शन घ्या.
श्रोतृवर्ग – सर्व स्तर, वयोगट.
रचना
- स्पष्टीकरण (समस्या, कारण, उदाहरण, पद्धत)
- ध्यानधारणा (कळीच्या शब्दांनी निर्देशित केलेली)
- सारांश
उपासना कुठे करावी – शांत, स्वच्छ असेल, गदारोळ नसेल अशा कुठेही.
उपासना कधी करावी – दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी. तसं शक्य नसेल, तर दिवसाअखेरीला, झोपी जाण्यापूर्वी.
कसं बसावं – मांडी घालून बसावं, जास्त उंच नसलेल्या व जास्त सपाट नसलेल्या, जास्त मऊ नसलेल्या व जास्त कडक नसलेल्या उशीवर मागची बाजू टेकावी. ते शक्य नसल्यास ताठ पाठ असलेली खुर्ची वापरावी. दोन्ही प्रकारांमध्ये तुमची पाठ ताठ राहाते व तुमचे हात मांडीवर एकमेकांवर ठेवावेत. डोळे अर्धे उघडे ठेवून, निमएकाग्र अवस्थेत जमिनीकडे दृष्टी ठेवणे उत्तम.
ध्यानधारणा किती वेळा करावा – दिवसातून किमान एकदा, शक्य असल्यास दोनदा (काम सुरू होण्यापूर्वी सकाळी व झोपण्यापूर्वी रात्री, प्रत्येक निर्देशित ध्यानधारणेवेळी किमान एक आठवडा दररोज. संकेतस्थळावर दिलेल्या यादीतील क्रमानुसार हे करावं. तुम्हाला गरज वाटेल तेव्हा कधीही तुम्ही आधीच्या ध्यानधारणेची पुनरावृत्ती करू शकता.
अधिक सूचनांसाठी –
[पाहा: ध्यानधारणा कशी करावी]