दैनंदिन जीवनामध्ये मनाचं प्रशिक्षण: ‘विशेष काही नाही’

आपल्या सर्वांमध्येच “मी”ची अंगभूत जाणीव असते. सकाळी उठून रात्री झोपी जाणारा “मी” विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असं आपल्याला वाटतं, आणि दिवसभरातील विविध भावनांचा पट “मी” अनुभवत असतो. हा “मी” सतत आनंदाच्या शोधात असतो आणि समस्या टाळू पाहत असतो, पण जीवन कधीही आपल्याला हवं तसं चालत नाही. या “मी”चं व “इतरां”सोबतच्या त्याच्या नात्याचं पुनर्मूल्यांकन करून आपल्याला अडचणींना सामोरं जाताना अधिक खुलं, निवांत व अधिक आनंदी कसं व्हायचं हे शिकता येतं.
Top